भव्य सायकल रॅलीच्या माध्यमातून शहीद जवानांना सलाम! वाई फेस्टिव्हल 2023
वाई l प्रतिनिधी:
वाई फेस्टिवल २०२३ आयोजित शहीद जवान स्मरणार्थ भव्य सायकल रॅली चा शुभारंभ महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडेशनचे अध्यक्ष श्री ओमप्रकाश तथा काका कोयटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
उत्कर्ष पतसंस्था व वाई जिमखाना वाई आयोजित वाई फेस्टिव्हलचे हे १६ वे वर्ष असून याही वर्षी वाईकर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सायकल रॅली तून शहीद जवानांचे स्मरण अणि प्रदूषण हटवा, पर्यावरण वाचवा चा संदेश देण्यासाठी 500 पेक्षा अधिक सायकल स्वार या रॅली मध्ये सहभागी झाले होते.
उदघाटन प्रसंगी कराड येथील बॅडमिंटन चे राष्ट्रीय खेळाडू श्री निलेश फणसळकर, नॅशनल गेम्स ऑफ इंडिया मध्ये सांघिक सुवर्ण पदक मिळवणाऱ्या नेहा सुनील क्षीरसागर, पल्लवी श्रीकांत शिंदे, सई किरण शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री सोमनाथ स्वामी , खास भुईंज वरून या रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी आले होते त्यांचा देखील सत्कार करणेत आला. वाई फेस्टिवलच्या पुढील सर्व कार्यक्रमांना वाईकर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्या असे आवाहन फेस्टिवल चे अध्यक्ष डॉ मंगला अहिवळे, कोषाध्यक्ष ॲड रमेश यादव, सचिव सुनील शिंदे व निमंत्रक श्री अमर कोल्हापुरे यांनी केले.
याप्रसंगी उत्कर्ष पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीमती अनुराधा कोल्हापुरे , फेस्टिव्हलचे समिती सदस्य श्री मदन साळवेकर, श्री श्रीकांत शिंदे, श्री शरद चव्हाण, श्री सलीमभाई बागवान, श्री संजय वाईकर, श्री सागर मुळे, श्री वैभव फुले, श्री भूषण तारू, नीला कुलकर्णी, अलका घाडगे, श्री शैलेंद्र गोखले, श्री अमीर बागुल, श्री नितीन वाघचौडे, श्री तुकाराम जेधे, सौ प्रिती कोल्हापुरे, ॲड. आनंद डुबल, मदन पोरे, प्रो. समीर पवार, प्रकाश पवार अणि उत्कर्ष पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.













