Thu, Jan 15, 2026
क्रीडा महाराष्ट्र

राज्य शासनातर्फे लातूर, बुलढाणा, सांगलीत होणार क्रीडा स्पर्धा – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

राज्य शासनातर्फे लातूर, बुलढाणा, सांगलीत होणार क्रीडा स्पर्धा  – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
Ashok Ithape
  • PublishedDecember 9, 2023

मुंबईदि. २८ : राज्यात शासनातर्फे सन २०२३-२४ या वर्षात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा लातूर येथेछत्रपती शिवाजी महाराज करंडक व्हॉलिबॉल स्पर्धा बुलढाणा येथेखाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लातूर येथे आणि भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सांगली येथे होणार आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी ही माहिती दिली आहे.

            मंत्रालयातील दालनात विविध विषयांवर आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे)आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. बनसोडे म्हणाले कीमहाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीची जोपासना व वाढीकरीता राज्यातील प्रतिभावंत खेळाडूंना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेतील प्रतिभावंत खेळाडूंना संधी मिळावी म्हणून स्पर्धाच्या आयोजनाकरिता शासनाने प्रति खेळ ७५ लाख रुपये एवढी तरतूद केली आहे. प्रतिखेळ ७५ लाख निधीमधून खेळाडूमार्गदर्शकव्यवस्थापकपंच तथा तांत्रिक पदाधिकारी  यांच्यासह खेळाडूंना रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

            स्थानिक आयोजन समितीस या स्पर्धाच्या आयोजनासाठी प्रति खेळ रु.७५.०० लाख उपलब्ध करुन देण्यात येणार असून यशस्वी आयोजनासाठी शासन निधी व्यतिरिक्त अधिक निधीची आवश्यकता भासल्यास आयोजन समितीस  निधी उभारण्यास शासनाने मंजुरी दिली असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. सर्वसाधारण धोरण ठरविणेसनियंत्रण करणेस्पर्धास्थळ निश्चित करणे तसेच स्पर्धेसाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करुन देण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचे गठन करण्यात आलेले आहे.

            या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक आयोजन समिती गठित करण्यात आली असूनसंबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्याध्यक्षसंबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक हे कोशाध्यक्षसंबंधित खेळाच्या राज्य संघटनेचे सचिव हे आयोजन समितीचे सचिव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी हे संयुक्त सचिव म्हणून काम पाहणार असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी यावेळी  सांगितले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!