Mon, Mar 2, 2026
सामाजिक

न्या.संदीप शिंदे समिती ९ डिसेंबर रोजी पुणे विभाग दौऱ्यावर

न्या.संदीप शिंदे समिती ९ डिसेंबर रोजी पुणे विभाग दौऱ्यावर
Ashok Ithape
  • PublishedDecember 8, 2023

पुणे,दि.८: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पुणे विभागाचा जिल्हानिहाय आढावा घेणार आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे. या दौऱ्यादरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!