शेतीतील नवनवीन प्रयोगांसाठी खडकी ता. वाई येथील प्रशांत शिंगटे यांचा गौरव.
![]()
प्रशांत शिंगटे यांचा सन्मान करताना कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक विराजदार, सातारा जिल्हा कृषी अधिकारी माईनकर व इतर मान्यवर खडकीच्या प्रशांत शिंगटे यांचा होतोय राज्यभर गौरव शेतीतील नवनवीन प्रयोगांची घेतली जातेय दखल
भुईज l प्रतिनिधी
खडकी ता. वाई येथील कृषी पदवीधर असलेले प्रशांत भिकू शिंगटे यांनी खडकी येथेच स्वतःच्या शेतात फुल शेती करत आपल्यावरोवर इतरहि तरूणांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देत सामुदायिक शेतीचा नवा पायंडा पाडल्याने त्यांचे वाई तालुक्यासह राज्यभर कौतुक होत असून राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्यासह अभ्यासक भेट देवून त्यांच्या फुल शेतीचे कौतुक करत आहेत.
नुकतेच त्यांच्या ग्रीन हाऊसमधील फुले या प्रकारातील उत्पन्न आणि नवीन प्रयोगावद्दल कृषी विभागाच्यावतीने कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात त्यांना सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक विराजदार, सातारा जिल्हा कृषी अधिकारी माईनकर तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अॅड. उदयसिंह पाटील, जि. प. चे माजी उपाध्यक्ष नितीन भुरगुडे पाटील आदी उपस्थित होते.
हळद, ऊस या पिंकाच्यावरोवरच ग्रीन हाऊसमधील फुल शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग करताना प्रशांत शिंगटे यांनी सेंद्रिय शेतीचा संदेश नव्या पिढीला वरोवर घेत केला आहे. तर शेतीच्याबरोबरीने पशुधन व्यवसायातील शिंगटे यांच्या कल्पतेची चर्चा राज्यभर होत आहे.
आपली शेती सांभाळत नवे तंत्रज्ञान इतरांनाहि देत सामुदायिक शेतीचा प्रयोग खडकी येथे राबवणा-या प्रशांत शिंगटे यांचा आदर्श सर्वत्र घेतला जात आहे.













