पत्रकारितेतील तारा निखळला – सुशील कांबळे यांचे निधन
![]()
वाई तालुक्यातील नामवंत पत्रकार वाई पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील बाळासाहेब कांबळे यांचे वयाच्या 45 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
मुळचे भुईंज तालुका वाई येथील व सध्या जेजुरीकर कॉलनी वाई येथील रहिवाशी शिक्षक बाळासाहेब कांबळे व शिक्षिका शालन बाळासाहेब कांबळे यांचा मुलगा व डॉक्टर शेखर कांबळे यांचा धाकटा भाऊ पत्रकार सुशील कांबळे होते सुशील हे पदवीचे शिक्षण घेऊन नकळत पत्रकारिते कडे वळले सुरुवातीला दैनिक ऐक्य पसरणी डेट लाईन वरून वार्ताहर म्हणून कामाला सुरुवात केली.
लेखणीच्या जोरावर अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता वाढवली त्यामुळे त्यांना दैनिक पुण्यनगरी वाई प्रतिनिधी म्हणून कामाची संधी मिळाली. संधीचे सोने करत आपल्या लेखणीच्या जीवावर प्रचंड लोकप्रियता मिळवली पत्रकारिता करत असताना सामाजिक भान ठेवून लोकांचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्यात त्यांना विशेष रस होता त्यामध्ये त्याांना समाधान वाटत असे अनेक माणसे जोडली मित्र जोडले लोकसंग्रह दांडगा होता पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक समस्या आपल्या प्रखर, निर्भीड लेखणीतून मांडल्या होत्या.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, व शाहू फुले यांच्या विचाराने प्रभावित होऊन समाज प्रबोधनाचे महान कार्य त्यांनी केले. त्यांचा चाहता वर्ग मित्रपरिवार मोठा होता. त्यांची लेखणी तडफदार बहारदार होती देखणे रुबाबदार व्यक्तिमत्व होते. लोकांचे प्रश्न सोडवण्यात त्यांचा हातखंड होता पत्रकारिता सेवा वृत्त मानून त्यांनी जनतेची सेवा केली.
सर्व स्तरातील लोकांशी त्यांचा जवळचा संबंध होता अशा लोकप्रिय लोकसंग्रह झुंजार पत्रकार सुशील कांबळे यांचे अल्पवयात व आकस्मित निधन झाल्याने अनेकांना तीव्र धक्का बसला त्यांचे वर सिद्धनाथ वाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जेष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड, पत्रकार विश्वास पवार, जयवंत पिसाळ, तानाजी कचरे, अशोक येवले, सामाजिक कार्यकर्ते अरुण आदलिंगे यांनी आपल्या मनोगतातून सुशील यांच्या कार्याचा उल्लेख केला.
अंत्यसंस्कारास वाई, भुईंज, साताऱ्यातील पत्रकार बंधू तसेच विविध राजकीय पक्षाचे मान्यवर, नातलग, मित्रपरिवार आपल्या लाडक्या पत्रकाराला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.
– दिलीप कांबळे पत्रकार बावधन













