कै. आ. डी. बी. कदम साहेबांच्या विचारांची आताच्या पिढीला गरज तुकाराम म्हस्के ; ३८ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
वाई : दि. २४/११/२३ :
कै. आमदार डी. बी. कदमसाहेब हे दुरदृष्टी व कल्पक नेतृत्व लाभलेले व्यक्तिमत्व होते. आज ३८ वर्षांनंतरही साहेबांचा स्मृतिदिन ट्रस्टमार्फत साजरा केला जातो यावरून समजते की डी. बी. कदम यांचे कार्य किती मोठे होते. त्यामुळे सध्याच्या पिढीला डी. बी. साहेबांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन पंढरपुर येथील साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत तुकाराम म्हस्के यांनी केले.
आरळे, ता. जि. सातारा येथील डी. बी. कदम सांस्कृतिक भवनामध्ये कै. आमदार डी. बी. कदम यांच्या ३८ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव चव्हाण, किसन वीर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, अमित कदम, नरेंद्र पाटील, कारखान्याचे संचालक सचिन जाधव, हणमंतराव चवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे म्हणाले, सध्याच्या काळात डी. बी. कदम यांच्या विचारांचा जागर होण्याच्यादृष्टीने समाजामध्ये जनजागृती होण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. किसन वीरआबांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली डी. बी. कदम साहेबांनी कारखान्याच्या चेअरमन पदाची धुराही अगदी व्यवस्थित पार पाडलेली होती. या काळात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जाणीवपुर्वक प्रयत्न केल्याचेही दिसून येते.
ज्येष्ठ नेते प्रल्हादराव चव्हाण यांनी आपल्या मनोगातमध्ये डी. बी. कदम साहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांचे आचार व विचारांची माहिती देत. जावली मतदार संघात डी. बी. कदम यांचे फार मोठे कार्य असून आजही त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते यावरूनही साहेबांच्या नावाचा व कामाचा दबदबा काय होता ते दिसून येते.
प्रा. अनिल बोधे म्हणाले की, भुविकास बँकेच्या माध्यमातून साहेबांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविलेल्या असून यातून बहुसंख्य शेतकऱ्यांना फायदा झालेला होता. प्रतिष्ठानचे
अध्यक्ष व किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनीही साहेबांचे विचार तळागाळात पोहचविण्याचे महत्वपुर्ण काम केलेले आहे. प्रतिष्ठानचे काम योग्यरितीने व साहेबांच्या विचारांची जोपासणा करीत सुरू असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार कै. डी. बी. • कदम प्रतिष्ठानचे खजिनदार अरविंद कदम यांनी मानले. श्रीनिवास शिंद यावेळी मानसिंग साबळे, संपतराव शिंदे, रफिक फरास, श्रीनिवास शिंदे, युवराज पवार, गजानन नलगे, महादेव कदम, नामदेराव कदम, विलास कदम, बाळासाहेब बर्गे, अविनाश ध. कदम, अविनाश चं. कदम, नरेंद्र कदम, दयानंद जाधव, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.













