Thu, Jan 15, 2026
Uncategorized आरोग्य

दिवाळी फराळालाही नाकं मुरडणारी मुलं. जंकफूडचा विळखा होतोय अधिक घट्ट.

दिवाळी फराळालाही नाकं मुरडणारी मुलं. जंकफूडचा विळखा होतोय अधिक घट्ट.
Ashok Ithape
  • PublishedNovember 23, 2023

दिवाळी म्हटलं की समोर दिसतो तो फराळ आणि त्यातून आपल्या आवडीचा पदार्थ पण तुम्ही कधी नाक मुरडणाऱ्या बालमित्रांच्या मनातलं जाणलयं का ?

समोर एकास एक ढिगभर दिवाळी फराळातील पदार्थ पाहून ही नाक मुरडणाऱ्या चिमुकल्यांची संख्या दिवसागणिक वाढतेय,
काय हवयं त्यांना आणि कसला तो हट्ट आता ओळखायलाच हवा,
रंगबिरंगी वातावरणातील मुलांचा जेव्हा ग्रुप बनतो तेव्हा तुम्हीच त्यांचे नकळत मित्र व्हा आणि ओळखा, जाणा त्याच्या मागचं ही आणि पुढचं ही विश्व, जे काल होत, आहे, आणि राहिलच पाहिजे याची ओळख करून द्या….

चायनीज, फास्ट फूड हे बोबड्या ओठातून ही बाहेर पडणारे शब्द जेव्हा खुमासदार शैलीत बालचिमुकल्यांना आपला मसाला सुगंध देऊन जातात, तेव्हा त्यांच्या तोंडून जंकफूड सारखे शब्द सहजरित्या बाहेर पडतात,

अगदी एक, दोन रुपयांपासून हजारो रुपयांची उधळण करून आपल्या जिभेचे चोचले पुरवत त्यावरच आपली हौसमौज करून पेटपूजा खतम म्हणून झोपी जाणारी आजची तरुणाई आता पाऊलागणिक दिसतेय आणि त्यांच्या मागाहून माग काढत बालचिमुकलेही ह्या जंकफूडच्या मायाजालात अडकून राहिले, ते इतके अडकले की त्यांची ओळख आता चायनीज जमान्यातील होऊन बसलेय.

दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असताना पालकवर्ग हजारो रुपये खर्ची करून दिवाळी फराळासाठी दर्जेदार साहित्य उपलब्ध करत घरी घेऊन येत आहेत, आणि महिलावर्ग सुद्धा तितक्याच उत्साहाने नवनवीन फराळातील पदार्थ बनवून आपली गोडधोड दिवाळी साजरी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण फास्टफूडच्या जमान्यात अगदी किराणा मालाच्या दुकानात सुध्दा उपलब्ध होणारे मसालेदार पदार्थ, नूडल्स आणि वेगवेगळ्या आंबटगोड पदार्थांची चटक या मुलांना भुरळ घालून जात आहे आणि त्याचा विपरीत परिणाम बारा महिने मुलांवर होत आहे,

अगदी दिवाळीचे एकास एक वरचढ ढिगभर पदार्थ पाहूनही मुलं आता नाक मुरडत आहेत. आणि ही संख्या अति वेगाने वाढत आहे.

का होत असं…?

एक दोन रुपयांपासून ते हजारो रुपयांचे हे पदार्थ अगदी कमीत कमी किमतीत आसपासच्या दुकानात भेटत आहेत, अति मसाला मुलांना अधिक चव मिळवून देत असतो, अगदी हलके फुलके पदार्थ खाऊन मुलांचे क्षणभर सहज पोट भरते, त्यामुळे अर्धपोटी जेवणारी मुलं अति चिडचीड करणारी पहायला मिळतात, चटकन राग आणि हट्ट धरून बसले की, पालकवर्ग मुलांना त्या गोष्टी सहज उपलब्ध करून देत असतात आणि याच गोष्टींची सवय होऊन मुलांचा कल जंकफूडच्या मायाजालात फसला की फसवला याचं कोडं अजूनतरी पालकांसाठी अधांतरीच आहे.

जंकफूडच्या विळख्यात सापडलेल्या मुलांना बाहेर काढणं हे पालकवर्गासाठी जरी नवे आव्हान असले तरी शारीरिक, मानसिक समतोल राखण्यासाठी मुलांना वेळीच रोखणे गरजेचे आहे.

दिपक पवार, चिंधवली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!