Fri, Apr 17, 2026
सातारा जिल्हा साहित्य

‘लोकविज्ञान दिनदर्शिका २०२४’ – विक्री साठी उपलब्ध.

‘लोकविज्ञान दिनदर्शिका २०२४’ – विक्री साठी उपलब्ध.
Ashok Ithape
  • PublishedNovember 18, 2023

​‘लोकविज्ञान दिनदर्शिका २०२४’ व त्यासोबतची ‘चिकित्सा छद्मविज्ञानाची’ ही सह-पुस्तिका नोव्हेंबर-अखेरी प्रसिद्ध होत आहे. पारंपरिक किंवा आधुनिक गैरसमजुती व अंधश्रद्धा यांना विज्ञानाची परिभाषा वापरत, विज्ञानाचा मुलामा देणाऱ्या छद्मविज्ञानाचे प्रस्थ वाढतच चालल्याने या वर्षी छद्मविज्ञान उर्फ नकली विज्ञान हा विषय निवडला आहे.

​ छद्मविज्ञानाबाबत समाज-शिक्षण, समाज-जागृती करणारे १२ प्रसिद्ध वैज्ञानिक, प्रबोधनकार (रिचर्ड डॉकिन्स, कार्ल सेगन, जेम्स रँडी, बी प्रेमानंद, डॉ. नरेंद्र दाभोलकर इ.) यांचे फोटो दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर एक याप्रमाणे आहेत. तसेच सोबत त्यांची तोंडओळख करून देणारी छोटी चौकट आहे. त्या त्या महिन्यातील विज्ञानदिन साजरा करण्यासाठी काही कल्पना आणि आकाश निरीक्षणासाठी मार्गदर्शक ‘तारांगण’  आहे. ​

​ ‘चिकित्सा छद्मविज्ञानाची’ या सोबतच्या सहपुस्तिकेत प्रा. जयंत नारळीकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर, मयंक वाहिया, प्रा. प. रा. आर्डे यांच्या ‘छद्मविज्ञान’चे बिंग फोडणा-या काही नावाजलेल्या लेखांचे संकलन आहे. तसेच प्रियदर्शिनी कर्वे, अंजली चिपलकट्टी, प्रकाश घाटपांडे, डॉ. शंतनु अभ्यंकर, डॉ. अनंत फडके इ. च्या लेखांमधून निरनिराळ्या क्षेत्रातील ‘छद्मविज्ञान’च्या काही मासलेवाईक उदाहरणांची पोलखोल केली आहे. प्राचीन भारतातील विज्ञान-तंत्रज्ञानात त्या काळाच्या मानाने कोणकोणत्या बाबतीत खूप चांगली प्रगती झाली हे मांडण्याऐवजी अफाट भाकडकथा विज्ञान म्हणून पसरवल्या जात आहेत. त्यापैकी काहींचा समाचारही या छोट्या सह-पुस्तिकेत घेतला आहे.

​‘लोकविज्ञान’च्या हितचिंतक जाहिरातदारांच्या मदतीमुळे’ लोकविज्ञान दिनदर्शिका-२०२४ व सोबतची सह-पुस्तिका’ यांची मिळून किंमत यंदाही तुलनेने खूपच कमी ठेवली आहे. (६४ पानी सह-पुस्तिकेसह ५० रु.)  शिवाय १० प्रति घेणाऱ्यांना १०%,  ११ ते ५० प्रती घेणाऱ्यांना १५% आणि ५० पेक्षा जास्त प्रति घेणाऱ्यांना २०% सवलत मिळेल. अशा घाऊक ऑर्डर्सबाबत पार्सलचा खर्च लोकविज्ञान संघटना करेल. (१० पेक्षा कमी प्रतींसाठी कुरियर/पार्सल परवडत नाही.) आपली मागणी नोंदवून तसेच इतर मार्गाने ‘लोकविज्ञान दिनदर्शिका २०२४’ च्या प्रसारास सहकार्य करावे ही विनंती.
सातारा जिल्हा संपर्क प्रमुख- अशोक इथापे, फोन – 9975746835

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!