मकरंदआबांच्या विकास कामांचा झंझावात असाच कायम राहणार नितीनकाका पाटील ; वाकणवाडीत जलजीवन योजनेचा शुभारंभ
दि. १४ नोव्हेंबर २३ :
वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याचे आमदार तथा किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मकरंदआबा पाटील यांनी आपल्या विधानसभा मतदार संघातील कानाकोपऱ्यातील गावांमध्ये विकासाची गंगा पोहचविण्याचे काम सुरू केलेले आहे. मतदार संघामधील कोणताच भाग विकासापासून वंचित राहणार नाही, याची तंतोतंत काळजी घेऊन आबांच्या विकास कामांचा झंझावात यापुढेही असाच कायम राहणार असल्याची ग्वाही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांनी दिली.
मापारवाडी- वाकणवाडी ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत जलजीवन योजनेचा शुभारंभ नितीनकाका पाटील यांच्या शुभहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोददादा शिंदे, संचालक रामदास इथापे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते.
नितीन काका पाटील पुढे म्हणाले की, मकरंदआबांनी विकास कामांबाबत कधीही तडजोड केलेली नाही. मतदार संघातील ज्या ज्या गावात, शहरात, वाड्या वस्त्यांवरील जतनेचे कामे सांगितेली होती, आहेत. ती सर्व कामांना गती देण्याचे काम ते स्वतः जातीने लक्ष घालून करीत असतात. त्यामुळेच आबांनी केलेल्या विकासकामांच्या झंझावातामुळे गेली तीन टर्म आबांना मोठ्या फरकाने विजयी करून विधानसभेवर पाठविलेले आहे. गेल्या १८ वर्षात ऊसावरून होत असलेल्या राजकारणमुळेच व भ्रष्टाचारामुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या किसन वीर कारखानाही शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव ताब्यात घेऊन त्याची आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नजिकच्या काळात किसन वीर कारखानाही सुस्थितीत येणार असून यासाठी ऊस उत्पादक सभासदांनीही यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी ऊस उत्पादकांनी कोणाच्याही तत्कालीन अमिषाला बळी न पडता आपला संपुर्ण ऊस किसन वीर कारखान्यालाच घालावा असे आवाहनही यानिमित्ताने करून ग्रामस्थांना दिपावलीच्या शुभेच्छाही दिल्या.
प्रमोददादा शिंदे म्हणाले की, आपल्या सर्वांचे नेते आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे मतदार संघात विकासकामांची घोडदौड सुरू आहे. त्याच पद्धतीने लवकरच किसन वीर कारखानाही उत्तुंग भरारी घेऊन आपल्या सर्वांचा किसन वीर कारखान्यालाही लवकरच सुगीचे दिवस येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. ग्रामस्थांच्यावतीने आपला संपुर्ण ऊस किसन वीर कारखान्यालाच गाळपास देणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. अमृत गोळे यांनी ग्रामस्थांच्यावतीने गावामध्ये स्मशानभूमीचे नुतणीकरण, सोपा ते वाणकवाडी मापरवाडी रस्ता, शाळा दुरूस्ती, गावामधील बंदिस्त गटर्स व जलजीवन योजनेच्या माध्यमातून जवळपास १ कोटींची विकास कामे आमदार मकरंदआबा पाटील यांच्या माध्यमातून झालेली असून स्मशानभुमीसाठी संरक्षक भिंत व मंदिरासाठी सभामंडपाची मागणी यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांच्याकडे केली असता लवकरच मकरंदआबांच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच गावातील विद्यार्थीनी विद्यार्थ्यांना, ग्रामस्थांना भुईंज, पाचवड व वाई येथे जावे लागते परंतु एस. टी. बस वेळेवर येत नसल्याने सर्वांच्या कामाचा खोळंबा होऊन कामे वेळेवर होत नसल्याचेही श्री. गोळे यांनी सांगितले. यावर तत्परतेने नितीनकाकांनी बस डेपोमध्ये फोन लावून याबाबतही कार्यवाही करण्यास सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवभारत सोसायटीचे संचालक विलास साळुंखे यांनी केले तर आभार सरपंच सर्जेराव पवार यांनी मानले. कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य कुमार बाबर, सहकार बोर्डाचे संचालक राजेंद्र सोनावणे, नवभारत सोसायटीचे चेअरमन दिनेश बाबर, बाजार समितीचे संचालक संजय मोहोळकर, पोपट जगताप, पै. प्रकाश पावशे, बेलमाचीचे उपसरपंच अब्दुल इनामदार, सुरेश बाबर, शेखर बाबर, सुनिल शेलार, मोहन गोळे, राजेंद्र गोळे, अशोक मतकर, तानाजी कदम, विकास काटकर, ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तरूण कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.













