Thu, Jan 15, 2026
महाराष्ट्र

येरवडा मध्यवर्ती कारागृहात ‘दिवाळी पहाट’चे आयोजन

येरवडा मध्यवर्ती कारागृहात ‘दिवाळी पहाट’चे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedNovember 13, 2023

पुणे दि.१३-अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला कारागृह व सुधारसेवा विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, अधीक्षक सुनिल ढमाळ, उपअधीक्षक बी.एन.ढोले आदी उपस्थित होते.

यावेळी बंदी कलाकरांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. अभंग व मराठी भावगितांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. बंदीजनांना यावेळी  दिवाळी फराळ देण्यात आला. श्री.गुप्ता यांनी बंदीजनांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले.

मध्यवर्ती कारागृहात अंगणवाडी बगीचा कामाचा शुभारंभ

येरवडा मध्यवर्ती कारागृहात ‘नन्हे कदम’ बालवाडीची संरक्षक भींत व बगीचा कामाचा शुभारंभ सिबेज कंपनीच्या रितु नथानी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कारागृह अधीक्षक सुनिल ढमाळ यांच्यासह कारागृहतील इतर अधिकारी, कार्पेडीअम कंपनीच्या मिनौती मरिन आणि सिबेजचे कर्मचारी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!