Tue, Mar 3, 2026
शिक्षण

जागतिक कौशल्य स्पर्धा – 2024 मध्ये युवक युवतींना सहभागी होण्याची सुवर्णसंधी

जागतिक कौशल्य स्पर्धा – 2024 मध्ये युवक युवतींना सहभागी होण्याची सुवर्णसंधी
Ashok Ithape
  • PublishedNovember 8, 2023

सातारा दि.8 (जिमाका) : जगातील 23 वर्षाखालील तरुण / तरुणींकरित त्यांच्यातील कौशल्य सादर करण्यासाठी दर 2 वर्षांनी जागतिक कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदाच्या वर्षी ही स्पर्धा फ्रांसमधील ल्योन येथे पार पडणार आहे. त्यानुषंगाने जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्रांशी संबंधीत जिल्हा व राज्य स्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौंसिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य व देश पातळीवर करुन निवड झालेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 01 जानेवारी 2002 रोजीचा किंवा नंतरचा असणे बंधनकारक आहे. तसेच अॅडीटीव्ह मॅन्युफॅक्चरींग, क्लाउड कम्प्युटींग, सायबर सिक्युरिटी, डिजीटल कंन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रीयल डिझायन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, इन्फॉरमेशन नेटवर्क कॅबलींग, मेकॅट्रॉनीक्स, रोबोट सिस्टम, इंटीग्रेशन अॅन्ड वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्रांकरीत उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 1999 रोजीचा किंवा नंतरचा असणे अनिवार्य आहे.

पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in या लिंकवर नाव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी साठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा नवीन प्रशासकीय इमारत, एसटी स्टॅंड च्या बाजूला, तळ मजला, सातारा. (दुरध्वनी क्र 02162-239938) या कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन सुनिल श पवार, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!