Mon, Mar 2, 2026
महाराष्ट्र साहित्य

वाईतील ‘संकल्प कलास्पर्श सोहळ्या’च्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

वाईतील ‘संकल्प कलास्पर्श सोहळ्या’च्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
Ashok Ithape
  • PublishedNovember 6, 2023

वाई / प्रतिनिधी :

वाई येथे होणाऱ्या नियोजित “संकल्प कला स्पर्श सोहळ्या” च्या तयारीचा मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छाही दिल्या.
दरे (ता. महाबळेश्वर) येथे दौऱ्यानिमित्ताने आल्यावर संकल्प कलास्पर्श सोहळ्याचे संयोजन समिती कार्याध्यक्ष श्री. मिलिंद शिंदे व मुख्य संयोजक श्री. अशोक इथापे व सहकाऱ्यांशी चर्चा करून ना. शिंदे यांनी कार्यक्रमाच्या तयारीबाबत शुभेच्छा देतानाच विविध सूचनाही केल्या.

पद्मश्री शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित या सोहळ्यात महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार, शाहीर साबळे मानवंदना पर कलाविष्कार, ‘कलास्पर्श’ विशेषांकाचे प्रकाशन व मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत आदी भरगच्च कार्यक्रमांचा समावेश आहे.

वाईतील द्रविड हायस्कूलच्या प्रांगणात कलास्पर्श सोहळा होणार असून त्यामध्ये राज्यभरातील विविध नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून सोहळ्याच्या नियोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती संपादक अशोक इथापे यांनी दिली आहे.

यावेळी संयोजन समिती प्रमुख श्री. अनिल जोशी, श्री. भालचंद्र मोने आदी सदस्य उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!