Thu, Jan 15, 2026
क्रीडा

शुभम इथापे ने चिंधवलीचा डंका राज्यस्तरावर वाजवला

शुभम इथापे ने चिंधवलीचा डंका राज्यस्तरावर वाजवला
Ashok Ithape
  • PublishedNovember 6, 2023

रिले स्पर्धेत चमकदार कामगिरी करत  सुवर्ण पदक आणि रौप्य पदक मिळवून शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत किसनवीर महाविद्यालय वाई येथील चार खेळाडूंची निवड झाली होती यामध्ये चिंधवलीच्या शुभम इथापे याचा सहभाग होता.

शुभम इथापे याने ४×४०० रिले स्पर्धेत सुवर्ण व ४×१०० रिले स्पर्धेत रौप्य अशा दोन पदकांना गवसणी घातली असून त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

याअगोदर पुणे बालेवाडी येथे झालेल्या चारशे मीटर धावणे स्पर्धेत शुभमने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकाची कमाई केली होती.

लहानपणापासूनच मैदानाची गोडी असल्याने आणि चाकोरीबद्ध जीवन जगण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करत शुभमने जिल्हा परिषद शाळा चिंधवली येथून विभागीय स्पर्धेला सुरुवात करत चमकदार कामगिरी करण्याची जणू काही शपथच घेतली की काय असाच प्रश्न पडला आणि त्याचे हेच गुण हेरून वडील श्री नारायण इथापे (माजी उपसरपंच) आणि संपूर्ण कुटुंबीयांनी त्याला पुढील शिक्षणासाठी मांढरदेव येथील अॅथलेटीक अॅकॅडमी येथे दाखल केले, तेथील सरांच्या जडणघडणीत आपले भरिव योगदान देत शुभमने अनेक स्पर्धांमध्ये आपले नशीब आजमावून स्वतःला सिद्ध केले याकामी कोचळेसर आणि सहकारी शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि ग्रामस्थांच्या शुभेच्छांनी शुभम इथापे याने चिंधवलीचे नाव आणखी मोठे केले होतेच आणि पुन्हा चंद्रपूर येथे आपली भरिव कामगिरी करत स्वताला सिद्ध केले.

या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मदनदादा भोसले, प्राचार्य श्री गुरुनाथ फगरे, तिरंगा एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री जयवंत (आबा) पवार, श्री सत्यविजय पवार, डॉ श्री मोहन सोनावणे, श्री राजेंद्र इथापे, उत्कर्ष पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाश पवार, शिक्षकेतर कर्मचारी, चिंधवली ग्रामस्थ, प्रेरणा संवाद ग्रुप आदींनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

दिपक पवार, चिंधवली

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!