Mon, Mar 2, 2026
स्थानिक बातम्या

विना परवाना फटाका स्टॉलवर कारवाई होणार – तहसिलदार राजेश जाधव

विना परवाना फटाका स्टॉलवर कारवाई होणार – तहसिलदार राजेश जाधव
Ashok Ithape
  • PublishedNovember 6, 2023

सातारा दि. 6 (जिमाका): दिपावली उत्सव दिनांक 11 नोव्हेंबर 2023 पासुन सुरु होत असुन दिपावलीमध्ये नागरिक मोठया प्रमाणात फटाक्यांची खरेदी करतात. सातारा शहरात व तालुक्यात तात्पुरत्या फटाका स्टॉलसाठी तहसिल कार्यालय सातारा यांच्या मार्फत परवाना दिला जातो तथापि काही ठिकाणी विनापरवाना फटाका स्टॉल उभारणी केलेचे निर्दशनास येत असून सदर विनापरवाना फटाका स्टॉलवर कारवाई करण्यात येणार आहे.

अनधिकृत फटाका स्टॉलवर कारवाई करण्यासाठी तहसिल कार्यालयाकडून संबंधीत पोलीस ठाणे प्रभारी यांना आदेश देणेत आलेले आहेत. तात्पुरता फटाका स्टॉल सुरु करु इच्छिणाऱ्यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रे सादर करुन परवाने घ्यावे, असे आवाहन सातारा तहसिलदार राजेश जाधव यांनी केले आहे.

तसेच परवानाधारक फटाका स्टॉलवर काही अनुचित प्रकार घडणार नाहीत याबाबत आवश्यक ती खबरदारी घेवुन सर्व अटी व शर्तींचे पालन परवानाधारक यांनी करावे. आगामी दिपावली सणासाठी नागरिकांनी फटाके फोडताना काळजी घ्यावी व दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी , असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!