साताऱ्याचा देवमाणूस अहोरात्र झटतोय शिक्षणव्यवस्थेसाठी…
![]()
शिक्षणप्रणेते डॉ श्री माणिककाका शेडगे आणि श्री भाग्यवान घाडगे लोकसेवा परिवार आणि आस प्रकल्प बळकटीसाठी घेतायत तितकेच कष्ट.
आज पाचवड ता.वाई येथे डॉ श्री माणिककाका शेडगे आणि श्री भाग्यवान घाडगे यांची श्री सत्यविजय पवार, श्री चंद्रशेखर पवार यांची पारिवारिक भेट झाली, पाचगणी, वाई येथील संस्थेचे कामकाज आटोपून त्यांनी पाचवड येथे आमच्याशी संपर्क साधला, या भेटीमध्ये लोकसेवा परिवाराची पुढील ध्येय धोरणे, उद्देश आणि भूमिका यांवर विस्तृत चर्चा झाली, ती संस्थेची दूरदृष्टी पाऊले विचारात घेऊन.
ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला आणखी बळकटी मिळाली तर ग्रामीण भाग शैक्षणिक दृष्ट्या परिपूर्ण होईल, शिक्षणाचा जागर घराघरात पोहोचला तर निरक्षरतेचा डाग कायमचा पुसला जाईल,
मुलं ही फुलांप्रमाणेच स्वच्छंदी असतात आणि त्यांना शिक्षणाची ओळख करून देणं हे आपलं आद्य कर्तव्य मानून आणि सामाजिक बांधिलकीतून समाजाला आपण काहीतरी देण लागतो या विचारातून शैक्षणिक, सामाजिक कार्याचा आजपर्यंतचा डॉ माणिक काका यांचा इतिहास खुप मोठा आहे,
पारधी समाजाबरोबर मराठी शाळा विकसित करण्यासाठी हजारो किलोमीटर पायपीट करणारा साताऱ्याचा देवमाणूस म्हणून परिचित असणाऱ्या डॉ माणिक काकांनी प्राथमिक शाळा टिकून राहिल्या पाहिजेत, गोरगरीबांची मुले शिकली पाहिजेत, शैक्षणिक धोरणात आणखी सुधारणा झाली पाहिजे यासाठी माणिककाकांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत अंगापूर ते मुंबई (मंत्रालय) असा ३५७ किलोमीटरचा प्रवास पायी करून शासनाला निवेदन देण्याची भूमिका बजावली..
शासनही त्यांच्या निवेदनाची योग्यरीत्या दखल घेते…
तहान भूक हरवून समाजासाठी निस्वार्थीपणे सेवा करणारी माणसं दुर्मिळ असतात…
त्यांच्या यशस्वी वाटचालीचा मागोवा “एक वेडाचा प्रवास” या दोन पुस्तकांच्या आवृत्ती मध्ये विस्तृतपणे मांडण्यात आला आहे, या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन सोहळा संपन्न ही झाला आहे,
जाणीवेची आग मनात उतरली आणि मागासलेल्या समाजाला नवी दिशा देण्यासाठी हे व्यक्तिमत्व किती किती ठिकाणी पोहोचलय आणि शिक्षणाचा जागर घरा घरात पोहोचवण्यासाठी आजही काका आणि त्यांचे सहकारी जे काही कष्ट घेतायत ते नक्कीच दिशादर्शक…
लोकसेवा परिवार अंगापूर आणि आस प्रकल्पातून सर्वांना नवी प्रेरणा घेण्याइतपत सर्वांगसुंदर आहे.
काकांच्या दूरदृष्टी विचारांना अनेक जेष्ठ, ज्ञानी, बुजुर्ग आणि तरूण सहकाऱ्यांची असलेली साथ पाहता हा ज्ञानगंगेचा अश्वमेध भविष्यात नक्कीच ग्रामीण भाग शैक्षणिक दृष्ट्या परिपूर्ण करेल आणि लोकसेवा परिवाराचा आलेख हा चढताच राहिल.
म्हणूनच काकांबद्दल एवढचं बोलू वाटते…
स्पर्धेत सहभागी होणारे लाखो असतात पण जिंकणारे थोडेच असतात, फळे फुले देणारी भरपूर असतात पण सुंदर व सुमधुर फळे फुले देणारी थोडेच असतात.
दिपक पवार, चिंधवली













