Mon, Mar 2, 2026
आरोग्य सातारा जिल्हा

दिपावली सणाच्या काळात डेअरींची अन्न व औषध प्रशासनाकडून होणार तपासणी

दिपावली सणाच्या काळात डेअरींची अन्न व औषध प्रशासनाकडून  होणार तपासणी
Ashok Ithape
  • PublishedOctober 30, 2023

सातारा, दि.30 (जिमाका):

दिपावली सणाच्या काळात अन्नपदार्थत होणारी भेसळ रोखण्यासाठी व नागरिकांना स्वच्छ आणि दर्जेदार अन्न प्राप्त होईल यासाठी अन्न औषध प्रशासन मार्फत सक्रियपणे कारवाई करण्यात येत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये अनेक डेअरीची तपासणी करून दुधाचे अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. संबंधित डेअरींना नोटीस बजावण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने ज्या डेअरी स्वच्छतेचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर परवाना निलंबन अथवा रद्द करणे या प्रकारचे कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे, अशी माहिती (अन्न) अन्न औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त अ. अ. भोईटे यांनी दिले आहे.

सणानिमित्त मिठाईसाठी खव्याची मागणी जास्त प्रमाणात असते हे लक्षात घेऊन त्या अनुषंगाने भेसळयुक्त खवा बाजारात येऊ नये या दृष्टीने अन्न औषध प्रशासन कारवाई करणार आहे त्याचप्रमाणे दही, तूप, पनी,र श्रीखंड, बासुंदी इत्यादी दुग्धजन्य पदार्थात जर भेसळ आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

मागील दोन-तीन महिन्यामध्ये अन्न औषध प्रशासनामार्फत संबंधित कार्यालयाचे मुख्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार सातारा शहरातील कंदी पेढे उत्पादक पेढ्यांची तपासणी करून अन्न नमुने घेण्यात आले आणि स्वच्छतेचे पालन न करण्यात आलेल्या काहीवर दंडात्मक कारवाई देखील घेण्यात आलेली आहे या प्रकारची कारवाई आणखी घेतली जाणार आहे.

दूध, खवा, पनीर, मिठाई इतर तसेच दिवाळीच्या अनुषंगाने वापरात येणारे कच्चे अन्नपदार्थ जसे रवा आटा मैदा इ. सर्व अन्नपदार्थ बाबत भेसळीची माहिती प्राप्त झाल्यास नागरिकांनी तात्काळ त्याबाबतची माहिती अन्न औषध प्रशासन यांना द्यावी, असे आवाहनही श्रीमती भोईटे यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!