Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा सामाजिक

सातारा येथे शाही दसरा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

सातारा येथे शाही दसरा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
Ashok Ithape
  • PublishedOctober 25, 2023

सातारा दि. २४, ( जि.मा.का. )

सातारा शहरातील शिवतीर्थ येथे मोठ्या उत्साहात दसरा महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सातारा वासीय मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

      सोहळ्याच्या सुरवातीस जलमंदीर राजवाडा येथे भवानी तलवारीस पोलीस विभागाच्या वतीने शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर जलमंदीर राजवाडा ते पोवई नाका शिवतीर्थपर्यंत शाही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये हत्ती, घोडे, उंट, ढोलताशा पथक यांचा समावेश होता.

    शिवतीर्थ येथे मिरवणूक दाखल झाल्यानंतर भवानीची आरती करण्यात आली. त्यानंतर आकर्षक आतषबाजी करण्यात आली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!