पूना कॉलेजच्या खेळाडूंची राज्यस्तरिय धनुर्विद्या स्पर्धेत पदकांची लयलूट पूना कॉलेजच्या सिद्धी सुरज साळुंखेची राष्ट्रीयस्तर धनुर्विद्या स्पर्धेत निवड
पुणे / प्रतिनिधी, दि. २५ –
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत पूना कॉलेजच्या सिद्धी सुरज साळुंखे ने 19 वर्षाखालील मुलींच्या गटात 30 मीटर रिकर्व्ह राउंड वैयक्तिक व टीम इव्हेंट मध्ये सुवर्णपदक पटकवून गुजरात गांधीनगर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर सिद्धी सुरज साळुंखेची निवड झाली
पूना कॉलेजच्या आदित्य मिलिंद गुहागर ने 19 वर्षाखालील मुलांच्या इंडियन टीम इव्हेंट मध्ये रौप्य पथक मिळवले तसेच 19 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये अंजुम आशिक अन्सारी हिने इंडियन टीम इव्हेंट मध्ये कांस्यपदक पदक मिळवले. अमरावतीचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदोलकर व अमरावती विभागाचे उपसंचालक विजय संतान यावेळेस उपस्थित होते.
या खेळाडूंना पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. अफताब अन्वर शेख, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. अय्याज शेख, क्रीडा शिक्षक प्रा. असद शेख तसेच प्रा. इम्रान पठाण क्रीडा शिक्षक यांनी मार्गदर्शन केले या कामगिरीसाठी पुना कॉलेजच्या संस्थेचे अध्यक्ष निसार पटेल, सचिव हनी अहमद फरीद, ट्रस्टी प्रा. हनीफ लकडावाला, उप-प्राचार्य डॉ.इक्बाल शेख, उप-प्राचार्य प्रा. इम्तियाज आगा, सुपरवायझर नसीम शेख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या खेळाडूंचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या













