Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा सामाजिक

साखळी उपोषण थांबवण्याचे चिटेघर प्रकल्पग्रस्तांना आवाहन

साखळी उपोषण थांबवण्याचे चिटेघर प्रकल्पग्रस्तांना आवाहन
Ashok Ithape
  • PublishedOctober 23, 2023

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत घेतली बैठक

सातारा दि. 2 (जि.मा.का.) –

पाटण तालुक्यातील चिटेघर लघु पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी चिटेघर प्रकल्पातील बाधित जमिनींचा वाढीव मोबदला देण्यासाठीचा नवीन प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या.

            या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांच्यासह संबधित अधिकारी व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

            प्रकल्पग्रस्तांनी आता मंजूर झालेली रक्कम स्वीकारावी असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जलसंपदा विभागाने सध्या जमिनीच्या मोबदल्यापोटी तीन पट रक्कम संबंधीत प्रकल्पग्रस्तांना वितरीत करावी. तसेच ही रक्कम मिळण्यास विलंब झाल्यामुळे त्यावर व्याज देण्याबाबतचा प्रस्ताव आणि त्यासोबतच आणखी एक पट मोबदला देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावा. सिंचन विभागाने संपादीत केलेल्या जमिनीची रितसर मोजणी करावी व त्यानुसार शेतकऱ्यांच्या शिल्लक जमिनी घेतल्यास त्या त्यांना परत कराव्यात. जिल्ह्यातील प्रस्ताव मार्गी लावण्यास काही अडचणी येत असतील तर त्यासाठी थेट त्यांच्या कार्यालयात संपर्क साधण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!