रेशीम शेतीतून आर्थिक उन्नती
रेशीम उत्पादन हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय याप्रमाणे हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. हा व्यवसाय कमी मजूरात मोठया प्रमाणात, घरातील लहान थोर माणसांचा उपयोग या व्यवसायात करून शेतकऱ्यास कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न मिळवीता येते हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले असून रेशीम शेतीतून आर्थिक उन्नती साधली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रेशीम शेती उद्योगविकास योजना राबविण्यात येणार आहे या योजनेतर्गत तुती लागवडीसाठी जवळपास 2 लाख १८ हजार रुपये तर संगोपनगृह बांधकामासाठी १ लाख ७९ हजार रुपये असे तीन वर्षासाठी जवळपास ३ लाख १७ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत तुती लागवड ६८२ मनुष्य दिवस, मजुरी दर २७३ रुपये, अकुशलसाठी 1 लाख ८६ हजार १८६ रुपये तर कुशलसाठी ३२ हजार रुपये असे एकूण २ लाख १८ हजार १८६ रुपये अनुदान आहे.
किटक संगोपनगृह बांधकामासाठी अनुदान : कीटक संगोपनगृह बांधकामासाठी मनुष्य दिवस २१३ मजुरी दर २७३ रुपये अकुशलसाठी ५८ हजार १४९ रुपये आणि कुशलसाठी १ लाख ७९ हजार १४९ रुपये अनुदान मिळणार आहे कीटक संगोपनगृह बांधकाम ५० बाय २२ प्रमाणे 1 हजार 100 वर्ग फूट बांधकाम तुतीच्या बागेजवळ करणे आवश्यक आहे.
अर्ज कुठे करावा : ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोप आहे, अशा शेतकन्यांनी सोयाबीन नंतर लागवड करण्यासाठी किंवा पुढील वर्षा करिता अर्ज जिल्हा रेशीम कार्यालय, सातारा, ग्रामपंचायत, किंवा तालुका कृषी अधिकारी येथे अर्ज सादर करणे आवश्यक आहे
अटी काय: या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अल्पभूधारक असावा, लाभार्थी मनरेगा जॉब कार्डधारक असावा, आधार कार्ड बँक खात्याला सलग्न केलेले असावे बँक खाते पासबुक झेरॉक्स आणि सिंचनाची सोय असल्याचा दाखला किंवा सातबारावर विहिर पड नोंद असणे आवश्यक आहे
केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र योजना : रेशीम संचालनालयाच्या वतीने केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र २ ही योजनासुद्धा राबविण्यात येत आहे या योजनेतून तुती लागवड, कीटक संगोपनगृह बांधकाम, कीटक संगोपन साहित्य तुती रोप वाटिका, बाल कीटक संगोपन केंद्र, रेशीम कोषापासून रेशीम धागा निर्मिती करण्यासाठी अॅटोमेटिक धागा निर्मिती व मल्टिएड रिलींग मशीन करिता सर्वसाधारण वर्गासाठी ७५ टक्के अनुदान आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी ९० टक्के अनुदान देण्यात येईल.
मनरेगा अंतर्गत 3 लाख 97 हजार 335 प्रति एकर तीन वर्षासाठी अनुदानसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, वाई-पाचगणी रोड, वाई या कार्यालयाशी किंवा 8208915059 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
प्यारसिंग पाडवी, जिल्हा रेशीम विकास अधिकार,
संकलन जिल्हा माहिती कार्यालय, सातारा













