Thu, Jan 15, 2026
चालू घडामोडी साहित्य

समाजप्रबोधनाचे उद्दिष्ट समोर ठेवून प्राज्ञपाठशाळामंडळाची शारदीय व्याख्यानमाला अखंडपणे सुरू

समाजप्रबोधनाचे उद्दिष्ट समोर ठेवून प्राज्ञपाठशाळामंडळाची शारदीय व्याख्यानमाला अखंडपणे सुरू
Ashok Ithape
  • PublishedOctober 18, 2023

वाई. दि. १७ :

वाई येथील शतकोत्तर कार्यरत असलेल्या प्राज्ञपाठशाळामंडळ या संस्थेच्या शारदीय उत्सव दि. २१, २२ व २३ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरा होत असून या तीनही दिवशी नामवंत वक्त्यांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते.

त्यामध्ये दि. २१ ऑक्टोबर २०२३ (शनिवार) रोजी नामवंत गिर्यारोहक जितेंद्र गवारे यांचे ‘माझ्या गिर्यारोहण मोहिमा या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि. २२ ऑक्टोबर २०२३ (रविवार) रोजी पुणे येथील शास्त्रज्ञ पराग महाजनी ‘आपल्या अवकाश मोहिमा आणि चांद्रयान ३’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून दि. २३ ऑक्टोबर २०२३ (सोमवार) रोजी जेष्ठ संगीतज्ज्ञ केशवचैतन्य कुंटे यांचे ‘महाराष्ट्र संगीत परंपरा आणि सद्यस्थिती सप्रयोग व्याख्यान होणार आहे अशी माहिती संस्थेचे सचिव अनिल जोशी व सहसचिव भालचंद्र मोने यांनी पत्रकारांना दिली.

गेली १०६ वर्ष समाजप्रबोधनाचे उद्दिष्ट समोर ठेवून प्राज्ञपाठशाळामंडळानेही शारदीय व्याख्यानमाला अखंडपणे सुरू ठेवलेली आहे असे सांगून अनिल जोशी म्हणाले या व्याख्यानमालेत यापूर्वी दत्तो वामन पोतदार, सेतू माधवराव पगडी, न. र. फाटक, पु. ल. देशपांडे, श्री. शं. नवरे, पुष्पा भावे, जयंत नारळीकर, प्रभाकर पणशीकर, दाजी भाटवडेकर, ना. ग. गोरे, कुमार सप्तर्षी, डॉ. नरेंद्र दाभोळकर, कुलगुरू देवदत्त दाभोळकर, डॉ. तारा भवाळकर आदी वक्त्यांनी या व्याख्यानमालेत विचार पणे गुंफलेली आहेत.

त्याचप्रमाणे यंदाच्या व्याख्यानमालेत शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित झालेले जितेंद्र गवारे यांनी आज अखेर माऊंट एव्हरेस्ट व ९ गिर्यारोहणाच्या मोहिमा पूर्ण केल्या असून त्यांनी अनेक मैलांचे सायकलिंग देखील केलेले आहे. यंदाच्या व्याख्यान मालेतील दुसरे इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशनचे अभियंता पराग महाजनी हे व्याख्यान गुंफणार आहेत. महाजनी यांनी आतापर्यंत ६ देशांमध्ये वेधशाळा उभारल्या आहेत. ते स्वतः जेष्ठ लेखक म्हणूनही प्रसिद्ध असून अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळालेले आहेत.

प्राज्ञपाठशाळामंडळाच्या परंपरेप्रमाणे या तीनही व्याख्यानांमध्ये कलेवर आधारित असून जेष्ठ संगीत हार्मोनियम वादक व बंदिशकार डॉ. केशवचैतन्य कुटे हे आपले संगीतविषयक अनुभवाधारित आपले व्याख्यान गुंफणार आहेत. डॉ. केशवचेतन्य कुटे हे केवळ संगीत आहेत असे नव्हे तर त्यांनी जेष्ठ संगीत शास्त्री डॉ. अशोक रानडे यांच्या तालमीत भारतीय संगीताचा कलापक्ष आणि शास्त्रपक्ष यांचे मार्गदर्शन घेतलेले आहे. त्यांनी स्वतः चारशे बंदिशी रचल्या असून त्यातील तीनशे बंदिशी ‘रागचैतन्य’ या ग्रंथरूपाने प्रकाशित झाल्या आहेत, असेही अनिल जोशी यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.

ही व्याख्यानमाला वाई येथील लोकमान्य टिळक स्मारक मंदिरातील रमेश गरवारे सभागृहात  दि. २१, २२ व २३ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आलेले आहे असे सहकार्यवाह भालचंद्र मोने यांनी यावेळी सांगितले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!