Mon, Mar 2, 2026
अभिष्टचिंतन

वाईच्या पश्चिम भागाच्या विकासाचे वारसदार – विकास अण्णा शिंदे

वाईच्या पश्चिम भागाच्या विकासाचे वारसदार – विकास अण्णा शिंदे
Ashok Ithape
  • PublishedOctober 15, 2023

वाई तालुक्याच्या पश्चिम जोर जांभळी खोऱ्यातील गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी यांच्या विकासासाठी सतत झटणारे डोंगरदऱ्यातील कुटुंबांचे आधारस्तंभ हाकेला धावून जाणारे सर्वमान्य लोकनायक बापू शिंदे व माझी सभापती राधाताई शिंदे यांच्या विचारांचा वारसा लाभलेले वाई मतदार संघाचे युवा नेते विकास अण्णा शिंदे यांचा वाढदिवस  15 ऑक्टोबर रोजी. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वाई खंडाळा महाबळेश्वर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर विकास अण्णांनी संघटन कौशल्याच्या जोरावर मतदार संघ पिंजून काढला आहे.

बापू शिंदे वाईच्या पश्चिम भागाचे किंग मेकर म्हणून राजकारणात मोठा दबदबा वाई विधानसभा पंचायत समिती स्थानिक निवडणुकीत बापू शिंदेंचा निर्णय किंवा कौल तिथं तिथच विजयाचा गुलाल ठरलेला. आजपर्यंत लोकनेते बापू शिंदे व राधाताई शिंदे यांनी पश्चिम भागासाठी भरीव योगदान दिले आहे, भागातील मंदिरे धार्मिक समारंभ कौटुंबिक समारंभ आजारपणासाठी भरीव आर्थिक मदत केली, लोकांना शासनाच्या भरवशावर न ठेवता स्वतः खर्च करून अनेक योजना कार्यक्रम राबवले त्यामुळे सामान्य माणसाच्या हृदयात बापू शिंदेंना अजूनही स्थान आहे.

पश्चिम भागाच्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होण्यासाठी मोरजी वाडा येथे विद्यालय सुरू केले.

बापू शिंदे राधाताई शिंदे यांचा राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा चालवणारे विकास अण्णा शिंदे यांचा वाई खंडाळा महाबळेश्वर संघात मोठा जनसंपर्क आहे. अण्णा नेहमीच युवा पिढी एकसंघ राहण्यासाठी प्रयत्न करतात, उद्योग व्यवसायासाठी मदत करतात अन्यायाविरुद्ध लढा उभारतात बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी वाई खंडाळा औद्योगिक वसाहतीत तरुणांना रोजगार मिळवून दिला.

छत्रपती उदयनराजे भोसले यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही विकास अण्णांचा नावलौकिक आहे.  लोकनेते बापूसाहेब शिंदे यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन काम करणारे युवा नेते विकास अण्णा शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिलीप कांबळे, पत्रकार बावधन 

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!