Thu, Jan 15, 2026
अध्यात्म महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २०२३ पारितोषिक वितरण मुंबईत संपन्न

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २०२३ पारितोषिक वितरण मुंबईत संपन्न
Ashok Ithape
  • PublishedOctober 14, 2023

मुंबईदि. १२ :  सार्वजनिक गणेशोत्सव हे छत्रपती शिवरायांचे कार्य व विचार पुढे नेण्याचे उत्तम माध्यम आहे. एकविसाव्या शतकात सार्वजनिक गणेशोत्सवाचे अधिक महत्व आहे. त्यामुळे हा उत्सव अधिकाधिक वैचारिक प्रबोधन करणारा व समाजाभिमुख व्हावा यासाठी शासन सर्वतोपरी सहाय्य करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

            राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रवींद्र नाट्यमंदिर येथे मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार संजय गायकवाडमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगेविभागाच्या उपसचिव नंदा राऊतपु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकरअकादमीच्या सल्लागार समितीच्या सदस्य श्वेता परुळेकरसांस्कृतिक कार्य विभागाच्या माजी उपसचिव विद्या वाघमारे आदींची यावेळी उपस्थिती होती.

            यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार आणि मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय विजेते आणि जिल्हास्तरीय विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. अकोला येथील श्री खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास प्रथमसांगली जिल्ह्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळ (यशवंतनगरविटाता. खानापूर)आणि तृतीय पुरस्कार पुणे जिल्ह्यातील मार्केट यार्ड मित्रमंडळ (मंचर आंबेगाव) यांनी राज्यस्तरीय अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. प्रथम क्रमांक विजेत्यांना पाच लाखद्वितीय क्रमांक २ लाख ५० हजार आणि तृतीय पारितोषिक विजेत्यांना १ लाख रुपये देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

            मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले कीराज्यातील ६३९ मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पुढील वर्षी अधिकाधिक सहभाग या स्पर्धेसाठी मिळेल. गणेश उत्सव हा वैचारिक उत्सव व्हावा. सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून एकतासमतेच चित्र समाजासमोर जावे ही अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

            प्रधान सचिव श्री. खारगे म्हणाले कीगणेश मंडळे विविध सामाजिक कामे करत असतात. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे शासनाचे काम आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ही पुरस्काराची संकल्पना आपण राबविली. गणेश उत्सव प्रबोधनाचे माध्यम म्हणून ही मंडळे काम करीत आहेतही कौतुकाची बाब असल्याचे ते म्हणाले.

            यावेळी जिल्हास्तरीय विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमादरम्यान भैरी भवानी परफॉर्मिग आर्टस् यांचे सादरीकरण असलेला ‘गणराज रंगी नाचतो’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसचिव श्रीमती राऊत यांनी केले, तर आभार श्रीमती जोगळेकर यांनी मानले.

            दरम्यानया स्पर्धेतील खालील जिल्हानिहाय विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

29. चंद्रपूर: सार्वजनिक गणेश मंडळ, चंद्रपूर

30. वर्धा : बाळ गणेश उत्सव मंडळसमुद्रपूर

31.भंडारा : हनुमान व्यायामशाळा गणेशोत्सव मंडळमोहगाव देवीमोहाडी

32. अमरावती : श्री बजरंग गणेशोत्सव मंडळअंबागेट

33. बुलढाणा : भक्ती गणेश महिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळबुलढाणा व सहकार्य फाऊंडेशन क्रीडा व बहु. संस्थाचिखली (विभागून)

34. वाशीम : मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ, वाशीम.

35. यवतमाळ :रिद्धी सिद्धी गणेश मंडळउमरखेड. 

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!