हिमोफिलिया रुग्णांसाठी आरोग्य शिबीर संपन्न
सातारा दि. 12:
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय व हिमोफिलिया सोसायटी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हिमोफिलीयाच्या रुग्णांसाठी आरोग्य शिबीर संपन्न झाले. यावेळी 55 रुग्णांची रक्ताची तपासणी करण्यात आली.
हिमोफिलिया हा एक अनुवंशिक आजार असून यामध्ये रक्त गोठवण्याचे प्रमाण अत्यल्पच असते. या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात हिमॅटॉलॉजी अंतर्गत पूर्णपणे मोफत औषधोपचार केले जातात. या शिबीरामध्ये दर 6 महिन्यांनी केली जाणारी इनहीबीटॉर चाचणी मोफत करण्यात आली.
या शिबीरामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. सुभाष कदम निवासी वैद्यकीय अधिकारी रश्मी कुलकर्णी, सोसायटीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले.













