Thu, Jan 15, 2026
क्राईम न्यूज सातारा जिल्हा

पाटण तालुक्यात राज्य शुल्क विभागाची कारवाई

पाटण तालुक्यात राज्य शुल्क विभागाची कारवाई
Ashok Ithape
  • PublishedOctober 13, 2023

तिघांना अटक व 19 लाख 75 हजार 400 किंमतीचा मुद्देमाल जप्त

सातारा दि. 12:

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कराड-चिपळून मार्गावर पाटण तालुक्यातील गोषाटवाडी हद्दीत कारवाई करत  गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह सहा चाकी व चार चाकी वाहन असा एकूण 19 लाख 75 हजार 400 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांनी दिली.

कराड व पाटण तालुका परिसरात गोवा बनावट दारुचा पुरवठा करणारे सदर गुन्हयातील व्यक्ती गोरखनाथ बाबुराव पवार रा.बेलवाडे खुर्द ता.पाटण, प्रदीप कृष्णात सलते रा.मु.सलते पो. बीबी ता.पाटण   व दिनेश दगडू कदम रा.वालोपे ता.चिपळूण जि.रत्नागिरी यांच्या विरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65(अ)(इ),81,83,90,103 व 108 अन्वये गुन्हा दाखल करुन   अटक करण्यात आली आहे.

या कारवाईमध्ये एकूण 25 बॉक्स गोवा बनावट दारु, एक सकस दुधाचे सहाचाकी वाहन, सकस दुधाची 553 कॅरेट तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण रुपये 19 लाख 75 हजार 400 किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 3 आरोपीं विरुदध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत   निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, प्रशांत नागरगोजे, विनोद बनसोडे व महिला जवान राणी काळोखे, मनिष माने, आबासाहेब जानकर, राजेंद्र आवघडे यांनी सहभाग घेतला.

जिल्हयामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु, गोवा बनावट दारु, तसेच इतर कोणत्याही प्रकारची बनावट निर्मिती, विक्री, वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयास देण्यात यावी असे आवाहनही श्रीमती   शेडगे   यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!