Thu, Jan 15, 2026
उद्योग विश्व सातारा जिल्हा

सातारा येथे विभागीय रोजगार मेळाव्याचे 18 ऑक्टोंबर रोजी आयोजन बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन

सातारा येथे विभागीय रोजगार मेळाव्याचे 18 ऑक्टोंबर रोजी आयोजन  बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन
Ashok Ithape
  • PublishedOctober 11, 2023

सातारा दि.11 (जिमाका) :

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, पुणे व धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा यांच्या

संयुक्त विद्यमाने  १८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सदर बझार सातारा येथे

विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे २३ पेक्षा जास्त खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे २ हजार ३०० पेक्षा जास्त रिक्तपदे या मेळाव्याकरिता कळविण्यात आलेली आहेत. या पदाकरिता किमान ८ वी ,९ वी उत्तीर्णासह १० वी, १२ वी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदवीकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री- पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.

इच्छूक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारानी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या विभागीय रोजगार मेळाव्याचा लाभ  जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहनही कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाच्या उप आयुक्त अ. उ. पवार यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!