उमेद अभियनांतर्गत महिला बचत गट हि चळवळ ख-या अर्थाने महिलांना सक्षम करण्यासाठी उपयुक्त
भुईंज, दि. ०४ ऑगस्ट :
महिला समुहांना प्रभागसंघ व ग्रामसंघाने दिलेल्या प्रोत्साहनामुळे घराघरातील महिला स्वयंभू होत असून त्यामुळे कुटुंब व्यवस्था सक्षम होते. याचा लाभ गाव आणि परिसर यांचा विकासदर उंचवण्यासाठी होतो यासाठी समुहातील महिलांनी सांधिक शक्तीचा व उमेद अभियानाचा अर्थ अनुभवया असे प्रतिपादन विश्ववंदिता प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ. संगिता भोसले यांनी केले.
विश्ववंदिता प्रभाग संघ भुईज यांच्या सन २०२२ २३ ची वार्षिक सर्व साधारण सभा नुकतीच – पाचवड येथे महयाद्री मल्टीपर्पज या हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी बाई तालुक्याच्या पूर्व भागातील प्रत्येक गावातील व वाडीवस्तीवरील १९ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील महिला समूह ( बचतगट) च्या १ हजार महिला उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना संगीता भोसले बोलत होत्या
यावेळी बोलताना सौ. संगिता भोसले पुढे म्हणाल्या की, उमेद अभियानाने महिला बचत गट हि चळवळ ख-या अर्थाने महिलांना सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरली. बचत आणि सहकार, सांधिक शक्ती यांना बळ देत महिलांच्या हाताला रोजगार देण्याची संधी गावोगावच्या महिला बचत गटांना मिळाली. त्यामुळेच बचत गट, ग्रामसंघ व प्रभाग संघ हि पत पुरवठा व प्रोत्साहन देणारी यंत्रणा यशस्वी झाली. विश्ववंदिता प्रभाग संघाने १९ गावात महिला बचत गटांना गावनिहाय ग्रामसंधाना जोडले व वर्षभरात सर्वच महिलांना न्याय देता आला हेच खरे उमेद अभियानाचे फलित होय.
यावेळी बोलताना उमेद अभियानचे जिल्हा समन्वयक रंजनकुमार वायदंडे म्हणाले की या अभियानाचे सहसंचालक तथा प्रकल्प संचालक संतोष हराळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे, जिल्हा व्यवस्थापक संस्था स्वाती मोरे, मनोज राजे, वाई पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नारायण घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अभियान व्यवस्थापक पूनम गायकवाड, सागर अंभग, सौरभ फरांदे यांच्या सहकार्याने हे अभियान घराघरात पोहचवण्यासाठी बळ मिळते. याहि पुढे प्रभाग संघाच्या अंतर्गत सर्व समूहांना योग्यते मार्गदर्शन व सहाकर्या केला जाईल. यावेळी विविध बँकांचे अधिकारी तसेच जिल्हा उद्योग केंद्र आण्णासाहेब पाटिल महामंडल कृषी विभागतगर्त आत्मा महात्मा फुले विकास महामंडळा या विभागांचे अधिकारी यांनी उपस्थिताना माहिती दिली.
प्रारंभी उपस्थिताचे स्वागत प्रभाग संघाच्या पदाधिकारी यांनी केले. यावेळी वरचे चाहूर भुईंज येथील तिरंगा स्वयं सहायत समूहातील सदस्या अमृता नितीन भोसले यांची स्पर्धा परिक्षेतुन न्यायधिश पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे नेटके नियोजन सी. आर. पी ताई बैंक सखी यांनी केले.













