Mon, Mar 2, 2026
आरोग्य शिक्षण

डॉक्टर शुभम निकम यांचे एम.डी परीक्षेत यश

डॉक्टर शुभम निकम यांचे एम.डी परीक्षेत यश
Ashok Ithape
  • PublishedOctober 3, 2023

भुईंज / प्रतिनिधी

गुळूंब ता. वाई येथील डॉक्टर शुभम पांडुरंग निकम यांनी शासकिय मेडिकल कॉलेज नागपूर येथे रेडिएशन ऑनकॉलॉजी विषयात एम. डी हि पदवी संपादन केली.

गुळूंब ता. वाई या ग्रामीण भागातील प्रसिद्ध डॉ. पांडुरंग नारायण निकम यांचा वारसा जपणारे त्यांचे सुपुत्र डॉ. शुभम यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी ब्रेस्ट कॅन्सर रेडिओ थेरीपी या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांना त्यासाठी विभाग प्रमुख डॉ. अशोककुमार दिवान व प्राध्यापक डॉ. विजयकुमार मोहविया यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले.

त्यांचे इंडियन मेडिकल असोशियशनचे पदाधिकारी डॉ. गजेंद्र पाटील, डॉ. शेखर कांबळे डॉ. शैलेश घेडे यांच्यासह वैद्यकिय व्यावसायिकांनी त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले.

लवकरच त्यांचा गुळूंब ता. वाई येथे डॉ. निकम मित्र परिवाराच्यावतीने नागरी सत्कार सोहळा होणार असल्याची माहिती त्यांच्या मित्र परिवाराने दिली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!