Thu, Jan 15, 2026
आरोग्य स्थानिक बातम्या

किसन वीर महाविद्यालय, वाई एनसीसी युनिट आणि तालुका विधी समिती, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छता ही सेवा” उपक्रमाचे आयोजन

किसन वीर महाविद्यालय, वाई एनसीसी युनिट आणि तालुका विधी समिती, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छता ही सेवा” उपक्रमाचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedOctober 2, 2023

वाई l प्रतिनिधी –

जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई एनसीसी युनिट आणि तालुका विधी समिती, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने वाई न्यायालय परिसरात 100 एनसीसी कॅडेट्सनी कॅप्टन डॉ.समीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वच्छता ही सेवा” उपक्रम पार पडला.

या उपक्रमाचे उदघाटन अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा.श्री.नंदिमठ आणि किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. सुनील सावंत यांच्या उपस्थितीत पार पडले.

त्यानंतर न्यायाधीश मा.तारू, न्यायाधीश मा.पाटो , वाई वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मा. रमेश यादव, उपाध्यक्ष मा.महेश शिंदे, ॲडव्होकेट खडसरे, ॲडव्होकेट गायकवाड, अधिक्षक किरण पोरे व पवार तसेच वाई न्यायालय येथील सर्वच स्टाफ यांनी संपूर्ण न्यायालय इमारत आणि परिसरात स्वच्छता केली.

या उपक्रमात 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियन, साताराचे हवालदार विश्वास सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला. वाई नगरपालिकेने पाण्यासाठी अग्नीशामक बंब पुरविला. रोटरी क्लब, वाई व वाई वकील संघटनेने सर्व 100 छात्रांना मास्क, हातमोजे आणि अल्पोपहार पुरविला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!