वाई l प्रतिनिधी : २ ऑक्टोंबर
महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण क्रीडा विभागा अंतर्गत कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद यांच्या विद्यमाने महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शासकीय शालेय हॅण्डबॉल स्पर्धेत वाई च्या ज्ञानदीप स्कूल १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्हा संघाचे पराभव करीत विभागीय विजेतेपद मिळविले.
संघाची नाशिक येथे होणा-या महाराष्ट्र राज्यस्तरीय शासकीय शालेय हॅण्डबॉल स्पर्धेसाठी निवड झाली.
१७ – वर्षांखालील मुले व मुली दोन्ही संघांनी कोल्हापूर विभागीय उपविजेतेपद मिळविले. १४ – वर्षाखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या केलेल्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरी बद्दल श्री. नितीन तारळकर जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा श्री. सुधीर महामुनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वाई यांनी शाळेमध्ये जावून यशस्वी संघाचे-खेळाडूंचे, व शाळेच्या प्रमुख प्राचार्या श्रीमती शुभांगी पवार, व क्रीडाशिक्षक श्री. सचिन लेंभे यांचे कौतुक, अभिनंदन सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विजेतेपद मिळविलेल्या संघामध्ये कु. आदिती नंदराज निंबाळकर, कु. मनस्वी मनोजकुमार जाधव, कु. गायत्री संतोष गलांडे,कु.प्राची प्रेमचंद कुमार, कु.अंतरा अभिजित भोसले, कु. श्रेया शेखर बाबर, कु.श्रेया कानिफनाथ जाधव, कु. सौंख्यदा सचिन लेंभे, कु. पल्लवी अमोल जाधव, कु. अक्षता अभिजित गावित, कु. सोनाक्षी दत्तात्रय ननावरे, कु.आर्या सचिन मांढरे, कु.सिद्धी सोमनाथ तांगडे, कु.आदिती दत्तात्रय जगताप, कु. वेदांतिका अजय घोलप, कु.वेदांतिका येवले, या खेळाडू मुलींचा समावेश होता. संघाला मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री.सचिन लेंभे सर, श्री अमर धापते यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या संघाचे संस्थेचे अध्यक्ष श्री एकनाथ जगताप, उपाध्यक्ष श्री चंद्रकांत ढमाळ, सचिव श्री राहुल जगदाळे, खजिनदार श्री.किरण तपकिरे,विश्वस्त श्री.विश्वनाथ पवार, श्री. जिजाबा पवार, श्री.दिलिप चव्हाण, प्रा.श्री.दत्तात्रय वाघचवरे.श्री. बाळकृष्ण पवार, श्री.रविंद्र केंजळे, श्री. विजय कासुर्डे, श्री चंद्रकांत शिंदे, श्री दत्ता मर्ढेकर. श्री सुनिल कोळी (क्रीडाधिकारी)
सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले.













