आक्रोश महामोर्चासाठी सातारा तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित राहणार – मनोहर माने
सातारा / प्रतिनिधी : दि. ०१ ऑक्टोंबर
अशैक्षणिक कामे, ऑनलाईन माहिती, शाळा बंद करणे, खाजगीकरण, कंत्राटी भरती, शिक्षक अतिरिक्त ठरवून दूरपर्यंत बदल्या करणे, पदोन्नती न करणे असे अनेक प्रश्न गोरगरिबांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे.
या सर्वांच्या विरोधात आम्हाला फक्त शिकऊ द्या ही अर्थ हाक देऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. सातारा तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक बंधू भगिनी यांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष श्री मनोहर माने यांनी विविध ठिकाणी शिक्षकांच्या भेटी दरम्यान केले.
सोबत जिल्हा नेते श्री बी एस कणसे, विक्रम डोंगरे, म.की. कदम, हनुमंत रसाळ, उमेश निकम, सौ संगीता सणस, राजेंद्र शिंदे, संजय शिंदे, सुभाष जगताप, गणपत यादव, श्रीकांत माने, विजय पोळ, पोपट शिंदे, बाळासाहेब माने, जयसिंग जाधव, हनुमंत घाडगे, सदाशिव कणसे ,वसंत सोनमळे, जितेंद्र गोरे आणि बहुसंख्य शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
यावेळी शाळाबाह्य कामे आणि दप्तर दिरंगाई या विरोधात शिक्षकांच्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान श्री प्रशांत मोरे, अध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना आणि श्री राजेश शिंगाडे ,अध्यक्ष सातारा जिल्हा शिक्षक परिषद यांनी मोर्चास सक्रिय पाठिंबा जाहीर केला













