Mon, Mar 2, 2026
कलाकार कट्टा महाराष्ट्र

लोकशाहीर प्रभाकर धनावडे यांचा सलग पंचवीस वर्ष प्रश्न-ऊत्तरे फोडण्याचा विक्रम….!!

लोकशाहीर प्रभाकर धनावडे यांचा सलग पंचवीस वर्ष प्रश्न-ऊत्तरे फोडण्याचा विक्रम….!!
Ashok Ithape
  • PublishedSeptember 26, 2023

संकल्प न्यूज प्रतिनिधी –

कोकणातील शक्ती-तुरा (जाखडी) शाहिरी या लोककला क्षेत्रात सन १९९७ पासून २०२३ पर्यत सलग पंचवीस वर्ष, लोककलेतील शाहिरी जुगलबंदीत प्रश्न-ऊत्तरे फोडण्याचा विक्रम शक्तीवाली शाहिराणा वृदाली दळवी-गोताड विरूध्द तुरेवाली शाहिराणा प्रिती भोवड-वीर यांच्या शाहिरी जुगलबंदी कार्यक्रमात शक्तीवाली शाहिराणा वृदाली दळवी-गोताड यांच्या प्रश्नाचे अचूक ऊत्तर देवून सलग पंचवीस वर्ष अनेक शाहिरांच्या प्रश्नांचे अचूक ऊत्तरे फोडण्याचा विक्रम केला.

शक्ती-तुरा (जाखडी) शाहिरीच्या इतिहासात असा विक्रम करणारे वाटद कवठेवाडी ता.जि. रत्नागिरीचे शाहीर प्रभाकर धनावडे हे एकमेव ग्रंथ आणि लोककला अभ्यासक लोकशाहीर आहेत. त्याचबरोबर शाहिरी जुगलबंदी कार्यक्रमात लागोपाठ तीन प्रश्नांची अचूक ऊत्तरे फोडून दोनदा हँट्रीक साधण्याचा विक्रम ही आजपर्यत त्यांच्याच नावावर आहे. आणि विशेष म्हणजे आजपर्यतच्या शक्ती-तुरा(जाखडी) शाहिरी या कोकणातील लोककलेच्या इतिहासातील हे विक्रम फक्त नी फक्त लोककला अभ्यासक लोकशाहीर प्रभाकर धनावडे त्यांच्याच नावावर लिहिले गेलेले आहेत.

लोकशाहीर धनावडे यांचा लोककला अभ्यास खुप दांडगा आणि व्यापक आहे. त्यानी अनेक लोककलांचे संशोधन करून आजपर्यत आठ पुस्तके सुध्दा लिहिलेली आहेत. त्यांच्या या विक्रमाचे श्रेय ते आपल्या आई-व़डिलांसह आपली वाचनाची आवड आणि “ग्रंथ हेच माझे गुरू” याना देतात.

त्यांच्या या एकमेवद्वितीय विक्रमा बद्दल ‘कोकण मराठी शाहीर परिषदेचे’ केंद्रिय अध्यक्ष हरिष प्रभू , लोककला सेवक संस्था आणि अवी-अनिल कलामंचाचे अध्यक्ष अविनाश गराटे, राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संदिप चिमटे, समाजसेवक सुनिल देऊलकर, कोल्हापुर भेदिक शाहिरी आणि पंत महाराज भजन संघटनेचे अध्यक्ष बबनमहाराज पाटील आदी मान्यवरानी केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!