Thu, Jan 15, 2026
कृषी वार्ता योजना

शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत
Ashok Ithape
  • PublishedSeptember 26, 2023

सातारा दि.26 (जिमाका) :

कृषी विभागाच्या माधमातून शेडनेट, हरितगृह या घटकांचा फलोत्पादन विकास अभियान या योजनेच्या माध्यमातून लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. माण, खटाव, वाई व महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्ज करावेत.

शासनाच्या कृषी विभागामार्फत शेडनेट व हरितगृह या घटकांकरिता ५० टक्के अनुदान देण्यात येते. अटल भूजल योजनेच्या माण, खटाव, वाई व महाबळेश्वर या तालुक्यातील ११५ गावांना / गावांमधील शेतकऱ्यांना या घटकांकिरिता २५ टक्के अतिरिक्त अनुदान येणार आहे.

शेडनेट व हरितगृह यांच्या वापरामुळे फुलपीक आणि भाजीपाला पिकांचे कमी क्षेत्रातून अधिक उत्पादन घेता येते. ज्या शेतकऱ्यांची जमीन धारणा दोन हेक्टर पर्यंत आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या घटकांचा लाभ घेण्याकरिता महा डी.बी.टी.(Mahadbt ) या संकेतस्थळावरून शेतकऱ्यांना अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी सबंधित तालुका कृषी विभागास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!