हिंदवी रेडिओचा साताऱ्यात रविवारपासून होणार प्रारंभ
![]()
‘मन की बात’ प्रसारणाने सुरू होणार सातारची नवी ओळख
सातारा / प्रतिनिधी :
श्रीनिधी एज्युकेशन सोसायटी संचलित हिंदवी रेडिओ 89.6 या कम्युनिटी रेडिओ स्टेशनचा शुभारंभ संस्थेचे प्रवर्तक, सचिव अशोकराव तथा नानासाहेब कुलकर्णी व खजिनदार सौ. अश्विनी कुलकर्णी यांच्या हस्ते रविवार, दि. 24 रोजी सकाळी साडेदहा वाजता साताऱ्यात होणार आहे.
या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने हिंदवी पब्लिक स्कूल, शाहूपुरी, सातारा येथे सकाळी 10:30 वाजता स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीनिधी परिवाराच्याच्या यशस्वी वाटचालीत विविध क्षेत्रातील स्नेहीजनांचे प्रेम, आशीर्वाद, स्नेह, सहभाग यांचा मोलाचा वाटा आहे. तरी हिंदवी 89.6 (कम्युनिटी रेडिओ स्टेशन) या नवीन व अभिनव उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी आपण उपस्थित राहून आम्हास उपकृत करावे ही नम्र विनंती.
हिंदवी 89.6 चा पहिला कार्यक्रम हा भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांची ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या प्रसारणाने होईल.













