Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा साहित्य

पावसाच्या सरींसोबत वेण्णाकाठी शब्दफुलांचा वर्षाव

पावसाच्या सरींसोबत वेण्णाकाठी शब्दफुलांचा वर्षाव
Ashok Ithape
  • PublishedSeptember 24, 2023

मेढ्यातील कवी संमेलनास संपूर्ण राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद

मेढा / प्रतिनिधी :

ज्ञानाई फाऊंडेशन, पुणे आणि विरंगुळा शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था मेढा यांच्यातर्फे  मेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या काव्य मैफिलीत बाहेरील पाऊस आणि सभागृहातील शब्द वर्षा यांनी उपस्थित रसिकांची मने मने चिंबचिंब भिजून गेली.
कविसंमेलन अध्यक्षपदी विलास वरे ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य विद्यापीठात अभ्यासक्रमात कविता असणारे कवी होते.

प्रमुख पाहुण्या दीपिका कटरे, जयकुमार खरात , सखी चित्रपटाचे निर्माते केतन पाटील आपुलकी संस्था बारामती, गणेश माजगावकर,
ज्ञानाई फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोककवी सीताराम नरके, (राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी), विरंगुळा शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ.जयश्री माजगावकर, सूत्रसंचालक रानकवी जगदीप वनशिव हे मान्यवर हजर होते. कार्यक्रमांची सुरूवात मान्यवरांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.जयश्री माजगावकर यांनी केले.

काव्यमैफिलीचे पहिले शब्दपुष्प कवी रमाकांत पडवळ धाराशिव यांनी आपल्या शीघ्रकाव्यातून रसाळ वाणीतून कविता सादर केले. अरुण कांबळे थेरगाव, आनंदा भारमल खंडाळा, अंकुश शिंदे शिंदेवाडी- वाई, विलास पिसाळ वाई, आनंद गायकवाड येरवडा, चंद्रकांत जोगदंड पुणे, संगीता माने सातारा, अनिता जाधव  लातूर, पुजा माळी बारामती, देवेंद्र गावंडे पिंपरी, क्रांती पाटील वाई, सोनाली ढमाळ बारामती, अजित माने सातारा, संजय भोरे बारामती, शुभांगी गायकवाड सातारा, प्राचार्य जगन्नाथ विभूते खंडाळा, सुशिला डायस सातारा या सर्वांनी प्रेम, पाऊस, शेतीमाती, लावणी, अभंग, भावगीत, गझल,  विरह अशा नवरसात चिंबचिंब करणारी कविता बहरून आली.     सर्व मान्यवर कवीचा सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास वरे आपल्या मनोगतात व्यक्त होताना म्हणाले, कवीने भाषण करू नये. आपल्या कवितेतून व्यक्त व्हावे. तरच समाजात लिखाणात राजकारणात आपली बांधिलकी जपू. कवीला मुजरा घालणारा कवी हा  कविराज आहे असे त्यांनी संबोधिले.

जयश्री माजगावकर यांनी जावली तालुक्यातील महती सांगणारी माझा जावली तालुका.ही रचना सादर केली अन् रसिक कवीची मने जिंकली कवी लेखक हे परिस्थितीवर थेट भाष्य करत आता परिवर्तनशील काव्य  निर्माण व्हावे. फक्त प्रशंसा करू नये,प्रत्येक साहित्यिकाची जबाबदारी आहे वाहवा करण्यात माहीर असणारे परखडपणे बोलत नसतात हे पण आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे अशा त्या बोलत होत्या..दरम्यान महात्मा गांधी वाचनालय कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला व पुस्तक प्रती भेट देण्यात आल्या.

संचालक अशोक दीक्षित यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व माजी संचालिका जयश्रीताई माजगावकर यांना हे वाचनालय कायमच सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी दिला. ग्रामस्थ मगदूम बाई, छाया पार्टे, सुलोचना पवार, आशाताई मगरे, माधवी कदम, दिक्षा चव्हाण, सौ.शेख व मेढा पोलीस ठाण्यातील मुलींचे निर्भया पथक साक्षी ससाणे, अदिती ससाणे, सिद्धी शेलार यांनी सहकार्य केले मनोगत व्यक्त केले.

काव्यमैफिलीचा समारोप लोककवी सीताराम नरके यांनी केला. महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा, जि. सातारा येथे हा काव्यमैफीलीचा कार्यक्रम संपन्न झाला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!