भुईज येथे ऋषीपंचमी निमित्त महिला भाविकांची अलोट गर्दी.
![]()
ऋषींच्या पुजनाने व श्री सद्गुरू आण्णा महाराजांच्या दर्शनाने झाली व्रताची सांगता.
ऋषीपंचमी निमित्त भुईजच्या कृष्णा नदीच्या काठावर आचार्य भृगूऋषीमठात महिला भाविकांची गर्दी. श्री क्षेत्र नारायणपूर येथील विश्वचैतन्य प. पू. श्री. सद्गुरू नारायण महाराज (आण्णा) यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व कृपाशिर्वादाने ऋषीपंचमीचा उपवासाच्या महाप्रसादाने ऋषीपंचमीचा महिमा जोपासण्यासाठी राज्यभरातून आलेल्या महिलांच्या गर्दीने अवघा कृष्णा काठ धन्य झाला.
दरवर्षी गणेश चतुर्थी नंतर दुस- याच दिवशी येणारी ऋषीपंचमी हा महिलांच्या व्रतवैकल्याचा सोहळा साजरा करण्यात येतो. याही वर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पहाटेपासूनच कृष्णा नदीच्या काठावर महिला भाविकांनी स्नानपर्वणीसाठी गर्दी केली होती देवी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन भृगूऋषी मठावर समाधी स्थळ व उत्सवमूर्ती समोर अभिषेक, आरती झाल्यानंतर उपस्थित महिला भाविकांना ऋपीपंचमीचे महात्म्य सांगताना श्री. सद्गुरू आण्णा महाराजांनी मानव जन्माचे सार्थक करा. माणसा तू माणसासारखा वाग असा संदेश देत महिलांना संस्कृती आणि संस्कार जोपासा कुटुंबाचा उद्धार करा असा हि कानमंत्र दिला.
यावेळी पोपट महाराज स्वामी, माजी आमदार मदनदादा भोसले आदींची मनोगते झाली.
उपवासाचा भात भाजीचा महाप्रसाद घेऊन महिलांनी हा ऋषीपंचमीचा उत्सव साजरा केला. श्री क्षेत्र नारायणपूर येथील शिष्यपरिवार यांनी पौरोहित्य केले. या कार्यक्रमासाठी भृगूमठ सेवेकरी, दत्त सेवेकरी, महिला सेवेकरी, ग्रामपंचायत भुईज यांनी शिस्तबद्ध नियोजन केले होते.
यावेळी कार्यकमास विविध जिल्हयातून महिला भाविक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वागत दत्तसेवेकरी मंडळाच्यावतीने विलासराव जाधवराव यांनी केले. सुत्र संचालन पत्रकार जयवंत पिसाळ यांनी केले.
व्रताचे उद्यापन म्हणजे उपवास उजवणेसाठी महिला सेवेकरी यांच्यावतीने खास व्यवस्था केली होती. याचे पौराहित्य जेष्ठ शिष्य खोपडे, बापू पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सेवेकरी यांनी शिस्तबद्धपणे पार पाडले.













