वाई आयटीआय ची मॅरथॉन स्पर्धा संपन्न
सातारा दि.21(जिमाका):
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई येथे रविवार दिनांक 17 सप्टेंबर पी एम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या.
आयटीआय ते गरवारे टेक्निकल फायबर व पुढे पॉवर फॅब्रिकेटर व परत आयटीआय अशी पाच किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन आयएमसी ऑफ आयटीआय चे चेअरमन गरवारे फुल फ्लेक्स चे अधिकारी किरण बाबर व दिशा अकॅडमीचे संस्थापक संचालक नितीन कदम यांच्याहस्ते हिरवा झेंडा फडकवत झाले.
स्पर्धेत एकूण 188 स्पर्धकांनी उस्फुर्त भाग घेतला. पुरुष व स्त्री गटातून प्रत्येकी प्रथम क्रमांकाचे तीन हजार रुपये, द्वितीय क्रमांकाचे दोन हजार रुपयांचे तृतीय क्रमांकाचे 1 हजार रुपयाचे पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. पुरुष गटात प्रथम क्रमांक ऋतिक उंबरकर, द्वितीय क्रमांक सुरज खोटरे, तृतीय क्रमांक साहिल संकपाळ यांना मिळाले. तर स्त्री गटातून प्रथम क्रमांक आरती सणस, द्वितीय क्रमांक श्रद्धा जायगुडे,तृतीय क्रमांक संचिता चव्हाण हिला मिळाले .













