उपराष्ट्रपतींच्या हस्ते कला प्रदर्शन क्षेत्रातील 84 कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्रदान , महाराष्ट्रातील 7 जणांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश
भारताच्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाचा प्रसार आणि प्रतिभावंत कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर उपराष्ट्रपतींनी दिला भर
![]()
संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार हा आपल्या प्रतिष्ठित कलाकारांसाठी एक मोठा सन्मान आणि ओळख आहे – अर्जुन राम मेघवाल
आपले बुजुर्ग कलाकार हे सांस्कृतिक मूल्यांनी समृद्ध अशा आपल्या प्राचीन संस्कृतीचे नेतृत्व करत आहेत – मीनाक्षी लेखी
यावेळी सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे आणि कित्येक शतकांपासून विविध नृत्य, संगीत आणि नाट्य प्रकार अस्तित्वात आहेत. आपले बुजुर्ग कलाकार हे आपल्या सांस्कृतिक मूल्यांनी समृद्ध प्राचीन संस्कृतीचे नेतृत्व करत आहेत.
संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार हा परफॉर्मिंग आर्ट क्षेत्रातील कलाकार तसेच गुरु आणि विद्वानांना दिला जाणारा राष्ट्रीय सन्मान आहे. 1,00,000/- (रु. एक लाख) ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार विजेत्यांमध्ये हिंदुस्थानी कंठ्य साठी रघुबीर मलिक आणि दिना नाथ मिश्रा, कर्नाटक कंठ्य साठी गोवरी कुप्पुस्वामी आणि अनसूया कुलकर्णी, भरतनाट्यमसाठी ललिता श्रीनिवासन आणि विलासिनी देवी कृष्णपिल्लई तर कुचीपुडी आणि ओडीशीसाठी अनुक्रमे स्मिता शास्त्री आणि कुमकुम लाल यांचा समावेश आहे. लोकसंगीतातील पुरस्कार विजेत्यांमध्ये झारखंडमधील महाबीर नायक , महाराष्ट्रातील हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर यांचा समावेश आहे.
संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार विजेत्यांच्या अधिक माहितीसाठी खाली लिंक दिली आहे:













