Thu, Jan 15, 2026
क्रीडा महाराष्ट्र

इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी श्री. किशोर येवले यांची सलग दुसऱ्यांदा बिन विरोध निवड

इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी श्री. किशोर येवले यांची सलग दुसऱ्यांदा बिन विरोध निवड
Ashok Ithape
  • PublishedSeptember 17, 2023

वाई प्रतिनिधी –

श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) येथे झालेल्या इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन च्या पंचवार्षिक सभेत पसरणी ता वाई येथील किशोर येवले यांची सलग दुसऱ्यांना फेडरेशन च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी व आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुज सरनाईक यांची सदस्य पदी बहुमताने निवड करण्यात आली.

त्यांच्या या निवडीचे क्रीडा क्षेत्रातून, महाराष्ट्रातून व विविध राज्यांतून विशेष स्वागत होत आहे
श्रीनगर येथे इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी किशोर येवले होते व निवडणूक अधिकारी म्हणून ऍड सुमित शर्मा यांनी काम पाहिले. या सभेस देशभरातील इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील ७० सदस्य हजर होते. या सभेमध्ये खालील प्रमाणे पदाधिकऱ्यांनीची निवड करण्यात आली.

यासभेमध्ये अध्यक्ष किशोर येवले – महाराष्ट्र
वरिष्ठ उपाध्यक्ष – फिलिया थॉमस – दमण अँड दिव
उपाध्यक्ष – विजय कुमार – कर्नाटक अब्रार शेख – मध्य प्रदेशअरुण साधू – गुजरात सचिव – तारिक अहमद झार्गर – जम्मू अँड काश्मीर सह सचिव नोरेम बोयनो सिंग – मणिपूर सूरज प्रकाश श्रीवास्तव – उत्तर प्रदेश महेश बाबू – तामिळनाड अभय निवास – मध्य प्रदेश प्रेम सिंग थापा – ओडिसा लक्ष्यजित डोले – आसाम
अनुज दत्तगुरू सरनाईक – महाराष्ट् अँटनी सेडली ब्रगांझा – गोवा- . साझ एस. के. – केरळ.सोनिया – हरियाणा.

किशोर येवले हे ३८ वर्षांपासून मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात कार्यरत असून आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक आहेत. त्यांनी अनेक देशात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सन २०१४ साली मलेशिया येथे झालेल्या जागतिक मार्शल आर्ट स्पर्धेत त्यांनी ५ सुवर्णपदके १ कांस्यपदक मिळवली इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी श्री. किशोर येवले सर यांची सलग दुसऱ्यांदा बिन विरोध निवड झाली असून २०१२ पासून महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट चे महासचिव म्हणून कार्यरत आहेत.

त्यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे काम केले आहे. पिंच्याक सिलॅट या खेळाला भारत सरकारच्या युवक व क्रिडा मंत्रालय, केंद्रीय 5% स्पोर्ट्स कोटा,ऑल इंडिया पोलिस कंट्रोल बोर्ड, खेलो इंडिया वूमन लीग,भारतीय विश्वविद्यालय संघ, ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाची मान्यता मिळाली आहे. त्याच प्रमाणे पिंच्याक सिलॅट हा खेळ गोवा येथे होणाऱ्या 37 व्या नॅशनल गेम्स मध्ये सुद्धा भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ने समाविष्ट केला आहे. या मान्यता मिळवण्यासाठी किशोर येवले यांचा मोलाचा वाटा होता त्याच प्रमाणे राहिलेल्या सर्व मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

येवले यांच्या या निवडीचे एशियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष शेख अलाउदिन याकुब (सिंगापूर) इंटरनॅशनल पिंच्याक सिलॅट फेडरेशन अध्यक्ष प्रबोवो सुनियानतो, कार्यकारी अध्यक्ष बेनी गौतमा (इंडोनेशिया), दक्षिण आशियाई पिंच्याक सिलॅट फेडरेशन चे अध्यक्ष मोहम्मद इक्बाल, इरफान भुट्टो, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुरेंद्र प्रतापसिंग विविध राज्य व जिल्हा पदाधिकारी खेळाडूंनी स्वागत व अभिनंदन केले.

पिंच्याक सिलॅट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट्स प्रकारचा खेळ आहे आणि हा खेळ जागतिक स्तरावर ९० देशामध्ये आणि आशियाई स्तरावर ४२ देशामध्ये हा खेळ खेळला जातो. पिंच्याक सिलॅट हा खेळ एशियन गेम्स, एशियन इनडोअर मार्शल आर्ट्स गेम्स, साऊथ ईस्ट गेम्स,नॅशनल गेम्स, ऑल इंडिया पोलिस गेम्स, खेलो इंडिया वूमन लीग, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी अशा ऑफिसियल राष्ट्रीय, अंतराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळला जातो.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!