Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करा – खासदार श्रीनिवास पाटील

जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करा – खासदार श्रीनिवास पाटील
Ashok Ithape
  • PublishedSeptember 8, 2023
सातारा. दि 9 : गत वर्षाच्या तुलनेत 4.6 टक्के जीव घेण्या अपघांताचे प्रमाण कमी झाले आहे. आणखीन हे प्रमाण कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने विविध विभागांच्या मदतीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, परिवेक्षाधिन श्री. चंद्रा,  अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी अनिकेत यादव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, प्रकाश गवळी यांच्यासह शासकीय  व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
खासदार श्री. पाटील म्हणाले, महामार्गावर अवजड वाहनांना जाण्यासाठी स्वतंत्र लेन तयार केली आहे. त्याच लेनमधून अवजड वाहने जातात का नाहीत याची तपासणी करावी. महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवर विविध उपाययोजना करा. सातारा ते- शेंद्रे व शेंद्रे ते कागल या महामार्गावरील  ब्लॅक स्पॉटची कारणे शोधून त्यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
वाहतुकीचे नियम काटोकरपणे पाळले जाईल यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी. रहदारीच्या रसत्यावरील  अतिक्रमण काढावे. रस्यांंदच्या कडेचे कठडे अनेक ठिकाणी तुटले आहेत. यामुळे महामार्गालगतच्या शेतांमध्ये पाणी जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे नुकसान टाळण्यासाठी कठडे बांधावेत. तसेच क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतुक करणाऱ्या वाहनांवर तसेच वाहन चालवताना मोबाईल वापरणाऱ्यांवर कारवाई करावी. त्याचबरोबर पुलांवरुन खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या करा. रस्ता सुरक्षीतेबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, अशा सूचनाही खासदार श्री. पाटील यांनी केल्या.
या बैठकीत राष्ट्रीय महामार्गालगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मिनी ट्रामा केअर सेंटर सुरु करण्याबाबत चर्चा झाली.
बैठकीत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. चव्हाण यांनी अपघातांचे केलेले शास्त्रोक्त विश्लेषण त्यानुसार नियोजन व अंमलबजावणी केल्याबाबत सविस्तर तपशील सादर केला.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!