सर्जेराव पवार यांची लगडवाडी, मापारवाडी, वाकणवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड
दि. ७ सप्टेंबर २०२३ :
लगडवाडी, मापारवाडी, वाकणवाडी (ता. वाई) येथील सरपंच यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्जेराव किसन पवार यांची बिनविरोध निवड झाली. यापुर्वीच उपसरपंच म्हणून रिक्त झालेल्या पदावरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या रिझवाना भालदार याची देखील ४ – ३ ने निवड झालेली होती.
भुईंज येथील मंडल अधिकारी श्री. डोईफोडे यांनी अध्यासी अधिकारी म्हणुन काम पाहिले. लगडवाडी, मापारवाडी, वाकणवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडीवेळी सर्जेराव पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे श्री. डोईफोडे यांनी जाहिर केले.
सर्जेराव पवार हे सलग २५ वर्ष निवडुन येत असुन त्यांनी आजपर्यंत सरपंच, उपसरपंच म्हणून भरीव कामगिरी केलेली अआहे. याची दखल घेऊन पुन्हा एकदा सरपंचपदाची माळ त्यांच्या गळ्यात टाकून ग्रामस्थांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे.
सर्जेराव पवार यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील, किसन वीरचे व्हाईस चेअरमन प्रमोददादा शिंदे, वाई तालुका सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, महादेव मस्कर, मधुकर भोसले, शशिकांत पवार, दिपक बाबर, अब्दुल इनामदार, अजित गोळे, मापरवाडी, राऊतवाडी, वाकणवाडी ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













