Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा सामाजिक

जालना येथील मराठा मोर्चातील झालेल्या लाठीचार्ज निषेधार्थ सातारा जिल्हा कडकडीत बंद

जालना येथील मराठा मोर्चातील झालेल्या लाठीचार्ज निषेधार्थ सातारा जिल्हा कडकडीत बंद
Ashok Ithape
  • PublishedSeptember 4, 2023

सातारा / प्रतिनिधी : ४ सप्टेंबर २०२३

सातारा जिल्ह्यात बंदला मोठा प्रतिसाद, शाळा महाविद्यालये व वाहतूक पूर्ण बंद. मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी शांततेत धरणे आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर जालना जिल्ह्यात पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत.

या घटनेच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाने सातारा जिल्हा बंदची हाक दिली होती. त्याला सातारा जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने दुकाने, व्यवसाय बंद ठेवून प्रतिसाद दिला.

खंडाळा,महाबळेश्वर, माण खटाव पाटण कराड, सातारा,फलटण, मेढा कोरेगाव येथील मार्केट पूर्णतः बंद राहिले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!