![]()
वाई नगर परिषदेस गरवारे टेक्निकल फायबर्स मार्फत अग्निशमन वाहन लोकार्पण
वाई / प्रतिनिधी :
27 वर्षांपूर्वी येथे कंपनी सुरू झाल्यापासून गरवारे परिवार आणि वाईकरांमध्ये जिव्हाळ्याचे व प्रेमाचे कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे. यापुढेही रक्षाबंधनाप्रमाणे हे नाते अतूट राहील. एकमेकांच्या समन्वयातून आणि सहकार्यातून कंपनीबरोबर शहराची आणि समाजाची प्रगती व उन्नती होईल, असा विश्वास गरवारे टेक्निकल फायबर कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक वायू गरवारे यांनी या वेळी व्यक्त केला.
येथील औद्योगिक वसाहतीतील गरवारे टेक्निकल फायबर्स लि. या कंपनीने आपल्या सी. एस. आर. फंडातून सुमारे ४३ लाख रुपये किंमतीचे अग्निशमन वाहन वाई नगरपरिषदेस उपलब्ध करून दिले. या वाहनाचा लोकार्पण सोहळा चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक वायू गरवारे व संचालिका सौ. मयुरी गरवारे यांच्या हस्ते संपन्न झाला.या प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष अनिल सावंत होते. कंपनीचे संचालक एस. पी. कुलकर्णी, प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी,असाेसिएटस व्हाईस प्रेसिडेंट वैभव जोशी, पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचीम, तहसीलदार सोनाली मेटकरी यांची प्रमुख उपस्थिती होते. यावेळी कंपनीतर्फे अग्निशमन वाहनाच्या चाव्या व कागदपत्रे पालिकेच्या प्रशासक व मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.
सौ.मयुरी गरवारे आपल्या मनोगतात म्हणाल्या कोणत्याही उद्योगाच्या उन्नती व प्रगतीसाठी स्थानिक नागरिक व
संस्था यांच्या सहकार्य आणि पाठबळाची गरज असते. वाईकरांनी नेहमीच सहकार्य करून गरवारे कंपनीच्या प्रगतीला हातभार लावला आहे. शहरातील संस्कृती आणि सामाजिक परंपरा अलौकिक असून असे वातावरण अन्य शहरात दिसत नाही असे ही त्या म्हणाल्या.
मा. नगराध्यक्ष श्री.अनिल सावंत यांनी गरवारे कंपनीने उद्योगाच्या माध्यमातून स्थानिक तरुण – तरुणी व महिलांना रोजगार देतानाच सामाजिक भान जोपासून शहर व परिसरातील सामाजिक, क्रीडा व शैक्षणिक उपक्रमांना सहकार्य करण्याचे दातृत्व दाखविले असल्याचे सांगितले. प्रदीप चोरगे यांनी प्रास्ताविकात गरवारे कंपनीने स्वतःच्या उद्योगात तसेच व्हेंडरच्या माध्यमातून अनेक तरुणांना, महिलांना रोजगाराचे उपलब्ध करून दिल्याने शहर व परिसरातील लोकांचे राहणीमान उंचाविले आहे. तालुक्यातील अनेक शाळांमधून मुलींना सायकली, गरजूंना शैक्षणिक साहित्य तसेच भगवा कट्टा प्रतिष्ठानला रुग्णवाहिका तसेच मॅरेथॉन स्पर्धा यांना सहकार्य करून कंपनीने समाजाला नवसंजीवनी देण्याचे काम केल्याचे सांगितले.
दीपक ओसवाल यांनी कंपनीच्या सामाजिक उपक्रमातील सहभागाची माहिती दिली. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे, माजी नगरसेवक भारत खामकर, महेंद्र धनवे, प्रदीप चोरगे, प्रदीप जायगुडे, कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी, अभिजित ढाणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शिक्षण प्रशासन अधिकारी साईनाथ वाळेकर परिचय करून दिला. विठ्ठल माने व संतोष दुरगुडे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी, अभिजीत जाेशी, विवेक देशपांडे, जी विघनेश कुमार, कामगार संघटनेचे अध्यक्ष सुधीर नवसरे, जनरक सेक्रेटरी दादासाहेब काळे, कंपनीतील अधिकारी, कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच पालिकेचे आजी – माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.













