Thu, Jan 15, 2026
शिक्षण

विद्यार्थ्यांना मैत्रेक चॅरिटेबल ट्रस्ट,पुणे आणि मावळा प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

विद्यार्थ्यांना मैत्रेक चॅरिटेबल ट्रस्ट,पुणे आणि मावळा प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
Ashok Ithape
  • PublishedAugust 31, 2023

वाई / प्रतिनिधी :

मैत्रेक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे आणि मावळा प्रतिष्ठान मुबंई यांच्या वतीने ता.२७/०८/२३ रोजी माडगणी , ता-वाई , जिल्हा सातारा येथील विद्यार्थना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकीचा उद्धेश डोळ्यासमोर ठेऊन समाजातील अशा घटकाना मदत करण्याच्या उद्देशाने मावळा प्रतिष्ठान गेली 15 वर्ष कार्यरत आहे.आत्तापर्यंत मावळा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार देखील संस्थेच्या माध्यमातून उचलला जात आहे. माडगणी गाव हे अतिशय दुर्गम आणि डोंगरमाथ्यावर असल्याने दीड-दोन तास पायी चालत जाऊन मैत्रक फाउंडेशन पुणे आणि मावळा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्तरीत्या ग्रामस्तांच्या मदतीने सदरील शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभलेले भारतीय सैन्य दलातील जवान आकाश जाधव यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

तसेच डाॅ अमोल धर्मजिज्ञासू यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आरोग्य,ग्राम उद्योग आणि विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव,सरचिटणीस रमाकांत बने,सचिव महेंद्र जाधव,सुशील जाधव,शरद जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले,शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर, आणि माडगणी ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!