Thu, Jan 15, 2026
शिक्षण सातारा जिल्हा

शैक्षणिक अखंडसाठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणातील सेतू प्रकल्प संपूर्ण जिल्ह्यात राबवावा – ज्ञानेश्वर खिलारी

शैक्षणिक अखंडसाठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणातील सेतू प्रकल्प संपूर्ण जिल्ह्यात राबवावा – ज्ञानेश्वर खिलारी
Ashok Ithape
  • PublishedAugust 29, 2023

सातारा दि. 28 : प्रगत शिक्षण संस्था फलटण, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रम जिल्हा परिषद सातारा व एच. टी पारेख फाउंडेशनच्या संयुक्तपणे राबवण्यात येत असलेल्या शैक्षणिक अखंडसाठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणातील सेतू हा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून तो जिल्ह्यात राबवावा, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात केंद्र सरकारच्या निपुण भारत अंतर्गत झालेल्या दोन वर्षाच्या कामाचे जिल्हास्तरावर सादरीकरण स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित बालशिक्षण परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, बाल शिक्षण परिषदेसाठी प्रगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झिया कुरेशी, कमला निंबकर बालभवन शाळेचे मुख्याध्यापक विश्वास जगदाळे, प्रियदर्शनी सावंत, बालवाडी मुख्याध्यापिका समीरा कुरेशी, संस्थेच्या विश्वस्त सचिव मधुरा राजवंशी, प्रकल्प समन्वयक प्रकाश अनभुले, सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका मदतनीस, पर्यवेक्षिका, शिक्षक, केंद्रप्रमुख स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हा प्रकल्प अतिशय चांगला असून या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यात, झालेला बदल सहज पाहायला मिळतो आहे. ३ ते ६ वयोगटाला मुलांसाठी भाव-भावना, विचार अभिव्यक्त करण्यासाठी या प्रकल्पाची जोड मिळाली आहे. प्रकल्पामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली.मुलांच्या कला-गुणांना वाव मिळाला आहे. आजचे शिक्षण परिषद ही चांगली प्रशिक्षण कार्यशाळा असून प्रगत शिक्षण संस्थेने हा प्रकल्प संपूर्ण जिल्हाभर राबवावा असेही श्री. खिलारी यांनी सांगितले.

केंद्रशासनाच्या निपुण भारत अंतर्गत निर्धारित केलेली उद्दिष्टे पूर्तीसाठी हा प्रकल्प उपयुक्त आहे असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती ढवळे यांनी यावेळी सांगितले.
प्रकल्प अधिकारी सोमनाथ घोरपडे यांनी बाल शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!