जिल्हास्तरीय रेड रिबन नाट्य स्पर्धा संपन्न
![]()
छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची राज्यस्तरीय रेड रिबन क्लब स्पर्धेसाठी निवड
सातारा दि.28 (जिमाका) : आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा महोत्सवांतर्गत जिल्हा एड्स नियंत्रण विभाग व एन.एस.एस विभाग छत्रपती श्विाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही/एड्स या विषयावर जिल्हास्तरीय रेड रिबन क्लब नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी कार्यक्रम अधिकारी हेमंत भोसले, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रोशन शेख, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वावरे, डॉ. पुनम लाहोटी, रेड रिबन क्लब समन्वय डॉ. एन.एन. इप्पर, डॉ. विद्या नावडकर आदी उपस्थित होते.
या नाट्य स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाविद्यालय प्रथम क्रमांक, स्व. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, पाचवड द्वितीय क्रमांक व स्व. वेणुताई चव्हाण,कराड महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकविला आहे.













