Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा सामाजिक

तहसीलदार राजेश जाधव यांनी केली अपघातग्रस्तांना मदत मदतीमुळे मिळाले तात्काळ उपचार

तहसीलदार राजेश जाधव यांनी केली अपघातग्रस्तांना मदत मदतीमुळे मिळाले तात्काळ उपचार
Ashok Ithape
  • PublishedAugust 26, 2023

सातारा दि.२६ (जि.मा.का) सकाळी 11.20 च्या दरम्यान सातारा येथील ग्रेड सेपरेटर मधून गोडोलीच्या दिशेने जात असताना ग्रेड सेप्रेटर मध्ये 2 व्हीलर व पादचारी यांचा अपघात झाला. सातारा तहसिलदार राजेश जाधव हे सातारा तहसील कार्यालयामधून जात असताना सदरील अपघात प्रथम दर्शनी लक्षात आल्यानंतर त्यांनी क्षणाचा हि विलंब न करता स्वतः अपघातग्रस्त अक्षय वसंत सुतार राहणार संभाजी नगर शिवराज पेट्रोल पंपच्या पाठीमागे, शिवाजी विष्णू साठे (वय 60) रा.एकांबे ता.कोरेगाव जि.सातारा या दोन्ही अपघातग्रस्तांना स्वतः गाडीत घेवून ते स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल झाले.

या  मदत कामात त्यांना शहर वाहतूक शाखेचे पोलीस राहुल भोये व संतोष पवार यांनी तात्काळ सहकार्य केले . तसेच तहसीलदार यांचे वाहन चालक वसंत संकपाळ यांनी पुढे होऊन अपघातग्रस्तांना मदत केली. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आज दोन अपघातग्रस्तांचे जीव वाचले. या कार्याबद्दल तहसीलदार राजेश जाधव व त्यांचा  सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे .

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!