‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२३-२४’ साठी नावे पाठविण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२३
मुंबई, २५ ऑगस्ट २०२३ :
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२३-२४’ साठी अर्ज मागविण्यात येत आहे.
हे पुरस्कार सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, रंगमंचीय कलाविष्कार, साहित्य, पत्रकारिता आणि इनोव्हेशन या क्षेत्रांमध्ये राज्यात भरीव व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवांना देण्यात येतो.
सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि एकवीस हजार रुपये असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे. यासाठी नावे पाठविण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२३ आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करावे.
https://youthawards.chavancentre.org/













