Thu, Jan 15, 2026
अध्यात्म स्थानिक बातम्या

प्राज्ञपाठशाळामंडळाच्या ‘धर्मकोश’ कार्यालयात संस्थेचे नवीन कार्यालय सुरू

प्राज्ञपाठशाळामंडळाच्या ‘धर्मकोश’ कार्यालयात संस्थेचे नवीन कार्यालय सुरू
Ashok Ithape
  • PublishedAugust 25, 2023

वाई दि. २४ ऑगस्ट :

‘‘शतकाची वाटचाल पूर्ण केलेल्या प्राज्ञपाठशाळामंडळाने आपल्या संस्कृती रक्षणामध्ये व धार्मिक सुधारणांच्या कार्यात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. परंतु नवीन काळ व नवीन पिढीच्या अपेक्षा यांना अनुसरून संस्थेने आपल्या कार्यात बदल करावा व यामध्ये नवीन पिढीतील अभ्यासू व्यक्तींना समाविष्ट करावे अशी अपेक्षा वाई येथील द्रविड हायस्कूल या शाळेचे माजी मुख्याध्यापक नागेश मोने यांनी व्यक्त केली. प्राज्ञपाठशाळामंडळाच्या ‘धर्मकोश’ कार्यालयात संस्थेने नवीन कार्यालय सुरू केले असून त्याचे उद्‌घाटन नागेश मोने यांनी यावेळी केले.

प्राज्ञपाठशाळामंडळाच्या ग्रंथसंग्रहालयात वीस हजारांहून अधिक दुर्मीळ ग्रंथांचा संग्रह असून त्यामध्ये असंख्य संदर्भ ग्रंथ समाविष्ट आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नागेश मोने म्हणाले वाईसारख्या छोट्या गावात अशा संदर्भ ग्रंथांचा संग्रह असणे ही बाब अनेकांना चकित करून सोडणारी आहे. मुख्य म्हणजे या संस्थेत ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सर्वधर्म अध्ययन केंद्राची’ सुरुवात झाली आहे ही बाब आजच्या काळात नवीन दिशा देणारी आहे असे मत मोने यांनी व्यक्त केले.

यावेळी नागेश मोने यांनी प्राज्ञपाठशाळामंडळास १,००,०००/-चा (एक लाख रुपये फक्त) धनादेश दिला असून त्याचा वापर संस्थेमध्ये प्रकाशित होणाऱ्या ग्रंथनिर्मितीस करावा असे मत मोने यांनी व्यक्त केले.

संस्थेचे सचिव अनिल जोशी यांनी नागेश मोने यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी संस्थेचे सहसचिव भालचंद्र मोने, संचालक नंदकुमार बागवडे, मदनकुमार साळवेकर, डॉ. राजेंद्र प्रभुणे, प्राज्ञपाठशाळामंडळाचा कर्मचारी वर्ग व मराठी विश्वकोश कार्यालयातील सर्व संपादक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!