जागतिक तिरंदाजी स्पर्धेत ‘सुवर्ण’ पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू साताऱ्याची अदिती स्वामी हीचा आज जलमंदिर पॅलेस येथे खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब सन्मान केला.
भारताच्या आदिती स्वामी हिने जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकाविले. साताऱ्याच्या आदितीने मिळविलेले हे यश देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठी कामगिरी ठरली आहे.
बर्लिनमधील जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या कंपाऊंड महिलांच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेराला पराभूत करून विश्वविजेतेपद मिळविले. अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेक्वेरा हिचा आदितीने (१४९-१४७) असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. बेकेरा दोन वेळा जगज्जेता राहिली आहे.
17 वर्षीय आदिती स्वामी ही वैयक्तिक स्पर्धेत जागतिक स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय तिरंदाज ठरली आहे तिच्या यशानंतर देशासह साताऱ्यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. आदितीचे तसेच तिच्या कुटुंबियांचे या यशाबद्दल खा. छत्रपाती उदयनराजे भोसले यांनी खूप खूप अभिनंदन केले व पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा दिल्या.













